रोहित्र बंद पडले? फोटो काढा अन् महावितरणला कळवा
महावितरणने जिल्हानिहाय सुरू केली विशेष व्हॉट्सप सेवा

अमरावती /9 ऑक्टोबर : दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरणच्या अमरावती परिमंडळाने नादुरुस्त किंवा बंद पडलेल्या रोहित्रांची (ट्रान्सफॉर्मर) त्वरित माहिती देण्यासाठी विशेष व्हॉट्सप सुविधा सुरू केली आहे. यामुळे रोहित्र दुरुस्ती आणि ते बदलण्याची प्रक्रिया जलद होऊन ग्राहकांना वेळेत वीजपुरवठा उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी व्यक्त केला आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या निर्देशानुसार याअगोदरच मोबाईल पव्दारे नादुरूस्त रोहित्राची माहिती देण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. प सुविधा मराठी व इंग्रजी भाषेत उपलब्ध असून पमध्ये ग्राहक आपल्या ग्राहक क्रमांकाद्वारे लॉगिन करून किंवा ‘गेस्ट’ म्हणूनही ‘नादुरुस्त रोहित्राची माहिती नोंदवा’ या पर्यायाद्वारे फोटो अपलोड करून एका क्लिकव्दारे तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासोबतच अमरावती परिमंडळात व्हॉट्स पची विशेष सेवा सुरू करण्यात आली असून अमरावती जिल्ह्यासाठी 78753 90223 आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी 78753 00340 हे दोन स्वतंत्र व्हॉट्सप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वीजग्राहकांनी नादुरुस्त रोहित्राचा फोटो काढून तो संबंधित जिल्ह्याच्या व्हॉट्सप क्रमांकावर पाठवायचा आहे. महावितरणला अचूक लोकेशन ट्रॅक करता यावे, यासाठी फोटोसोबत रोहित्राचे नाव, ठिकाण आणि सविस्तर पत्ता देणे आवश्यक आहे.





