16 वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू

तिवसा/22 नोव्हेंबर : शहरातील समर्थ चौक येथील एका 16वर्षीय मुलांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना रविवार ता. 22रोजी सकाळी 8 वाजता दरम्यान उघडकीस आली. धिरज संतोष बिजवे असे मृत मुलाचे नांव आहे.
मृतक धिरज हा रात्री जेवण करून साखर झोपेत असताना सुमारे 4वाजता दरम्यान त्याच्या हाताला काही तरी चावल्याचा त्याला भास झाला, त्यामुळे पाणी पिऊन तो पुन्हा झोपी गेला, दरम्यान पहाटे 6वाजता त्याला स्वास घेण्यासाठी त्रास झाल्याने त्याला तातडीने तिवसा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.मात्र उपचारा आधीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.तिवसा पोलीसांनी पंचनामा करत मर्ग दाखल केला आहे.16वर्ष्याच्या धिरजच्या मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतक धिरजच्या वडिलाचे तीन वर्षापूर्वीच निधन झाले,त्यामुळे घरातील उदरनिर्वाहाची जबाबदारी धीरजवर होती. शिक्षणासह तो भाजीपाल विक्री करून आईला उदरनिर्वाहासाठी मदत करत होता.धिरजला एक लहान भाऊ आहे. कमी वयातच वडिलांचे छत्र हरविल्याने धिरजवर कुटुंबाची जबाबदारी होती.मात्र मोठ्या मुलांच्या निधनाने आईला मोठा धक्का बसला असून परिसरात मोठा शोककाळ पसरला आहे.

Back to top button