मेळघाटचा पाहुणचार, खाद्यसंस्कृतीची चव न्यारी
पारंपरिक पदार्थ बनविण्याचा घेतला आनंद

मेघना बोर्डीकर यांनी स्थानिक महिलांच्या कौशल्याचे केले कौतुक
चिखलदरा /22 नोव्हेंबर– मेळघाटचा निसर्ग, आदिवासी जीवनशैली आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेत राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्थानिक महिलांच्या पाककलेचे कौतुक केले. दोन दिवसांच्या दौर्यात त्यांनी कुकरु-खामला परिसरातील पारंपरिक खाद्यपदार्थ बनविण्याची पद्धत जाणून घेतली. एवढेच नव्हे, तर स्वयंपाक सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन स्वतः पदार्थ घोटण्याचा आनंदही घेतला.
दौर्याच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत बोर्डीकर यांनी स्थानिक महिलांशी संवाद साधला. पारंपरिक पद्धतीने तयार होणारे खाद्यपदार्थ, त्यांची बनविण्याची पद्धत आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीची वैशिष्ट्ये जाणून घेतली. स्वयंपाकात स्वतः सहभाग घेतल्याने उपस्थित महिलांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
त्यानंतर त्यांनी मेळघाटची प्रसिद्ध रबडी चाखली. मेळघाटचा साधेपणा, खाद्यपदार्थांची खास चव आणि स्थानिकांचा आपुलकीचा पाहुणचार यामुळे हा दौर्यातील प्रसंग लक्षवेधी ठरला. यावेळी त्यांनी काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्र, चुरणी ग्रामीण रुग्णालयासह विविध ठिकाणी भेट देऊन आदिवासी बांधवांशी संवाद साधला





