एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी ‘पदवीच्या पलीकडे यावर विशेष व्याख्यान

प्रा.राम मेघे कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात

अमरावती/9 ऑक्टोबर : विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, उपाध्यक्ष ड. उदय देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. हेमंत देशमुख, सचिव युवराजसिंग चौधरी, तसेच कार्यकारी सदस्य नितीन हिवसे, डॉ. पूनमताई चौधरी, श्री. पंकज देशमुख, प्रा. विनय गोहाड आणि प्रा. गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. राम मेघे अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय, बडनेरा येथे एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी ‘पदवीच्या पलीकडे : अर्थपूर्ण करिअरची उभारणी’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते
या व्याख्यानासाठी पूनम बाधिये, बिझनेस डायरेक्टर – दक्षिण आशिया, आर्च्रोमा (-ीलहीेार) यांचे मार्गदर्शन लाभले त्या रासायनिक अभियांत्रिकी पदवीधर असून आयआयएम कोझिकोड येथून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना कॉर्पोरेट क्षेत्रातील 22 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून व्यवसाय विकास, विक्री, ब्रँड व्यवस्थापन आणि व्यावसायिक धोरण या क्षेत्रांत त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.या संवादात्मक सत्रामध्ये त्या विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट जगतातील प्रत्यक्ष अनुभव, उद्योगक्षेत्राच्या बदलत्या अपेक्षा, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, संवादकौशल्ये आणि व्यवस्थापकीय कौशल्यांचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले केवळ शैक्षणिक पदवी मिळवणे पुरेसे नसून, व्यावहारिक ज्ञान, व्यावसायिक दृष्टिकोन, सातत्याने शिकण्याची वृत्ती आणि बदलांशी जुळवून घेण्याची क्षमता ही यशस्वी करिअरसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले
यावेळी प्राचार्य डॉ अजय ठाकरे यांनी विद्याथ्यांनी डिग्रीच्या पलीकडे स्वतःचे कौशल्य विकसित करावे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय ठाकरे एमबीए विभागप्रमुख डॉ. शशिकांत थोरात, जनसंपर्क व प्रसार अधिष्ठाता डॉ. लोभस घडेकर, यांच्या उपस्थोत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले
या व्याख्यानामुळे एमबीएच्या विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाच्या सैद्धांतिक ज्ञानाची प्रत्यक्ष उद्योगक्षेत्राशी सांगड घालण्याची संधी मिळणार असून, कॉर्पोरेट क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यास मदत होणार आहे. उद्योग आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील समन्वय अधिक दृढ करून विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख शिक्षण देणे आणि त्यांना भविष्यातील व्यावसायिक जबाबदार्‍यांसाठी सक्षम बनवणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. कार्यक्रमाच्या यशवितेसाठी प्रा आतिफ सईद प्रा मंगेश डंबाळे,प्रा रश्मी मालपाणी,प्रा यशश्री आवारे,संग्राम जगताप,शैलेंद्र देशमुख यांनी प्रयत्न केलेकार्यक्रमाचे संचालन संस्कृती ठाकरे व गौरी गिरणाळे यांनी केले आभार प्रदर्शन डॉ लोभस घडेकर यांनी केले.

Back to top button