अमरावती मुद्रक संघाच्या बैठकीत कार्यकारिणीची निवड
एकजुटीने काम करण्याचा निर्धार

अमरावती /26 नोव्हेंबर- अमरावती मुद्रक संघाच्यावतीने रविवार, दि. 22 नोव्हेंबर 2026 रोजी साईनगर येथील हॉटेल द स्काय लिफ ईन इन येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला अमरावती शहरातील मुद्रण व्यवसायाशी संबंधित व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या संघटनात्मक बांधणीसह भविष्यातील कार्याची दिशा निश्चित करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या सभेमध्ये अमरावती मुद्रक संघाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली. संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकजुटीने आणि समन्वयाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. अमरावतीच्या मुद्रण व्यवसायासमोरील विविध प्रश्न, व्यावसायिक अडचणी, मुद्रकांमधील परस्पर समन्वय, संघटनेची भविष्यातील वाटचाल तसेच सदस्यांच्या हितासाठी राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांवर यावेळी चर्चा करण्यात आली. आगामी काळात संघटनेच्या माध्यमातून कोणती कार्ये हाती घ्यावीत, सदस्यांच्या समस्या कशा सोडवाव्यात आणि संघटनेचे कार्य अधिक व्यापक कसे करावे, याबाबत उपस्थित सदस्यांनी विविध सूचना मांडल्या. विशेष म्हणजे, संघटनेच्या आगामी कार्ययोजना आणि पुढील वाटचालीसंदर्भात मांडण्यात आलेल्या प्रस्तावांना उपस्थित सदस्यांनी एकमताने संमती दर्शविली. संघटनेच्या बळकटीकरणासाठी सहकार्य, एकजूट आणि सक्रिय सहभाग नोंदविण्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी चहा व स्वागताने झाली. त्यानंतर सकाळी 11 वाजता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. विविध विषयांवरील चर्चा, संघटनात्मक निर्णय आणि कार्यकारिणी निवडीनंतर दुपारी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. अमरावतीतील मुद्रण व्यावसायिकांना एका व्यासपीठावर आणणे, त्यांच्या व्यावसायिक प्रश्नांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे, व्यावसायिक हितसंबंधांचे संरक्षण करणे तसेच संघटनेच्या माध्यमातून विविध विधायक उपक्रम राबविणे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ही सभा अमरावती मुद्रक संघाच्या आगामी वाटचालीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली.





