500 लाभार्थ्यांना सारथी स्मार्ट केन व ज्योती स्मार्ट गॉगलचे वितरण
अंध विद्यालय अमरावती येथे

अमरावती /5 जून: स्थानिक दि.ब्लाईड वेलफेअर असोसिएशन, अमरावती व्दारा संचालीत डॉ. नरेन्द्र भिवापूरकर अंध विद्यालय, आश्रित अंध कर्मशाळा अमरावती. व राष्ट्रीय दृष्टीहिन संघ, महाराष्ट्र विभाग, अमरावती यांच्या सयुक्त विद्यमाने दृष्टीबाधीत विद्यार्थी व विद्यार्थिनींना ई.सी.जी.सी. मुंबई यांच्या सौजन्याने 500 सारथी स्मार्ट केन व ज्योती स्मार्ट गॉगलचे वितरण शिबीर संस्थेतील विद्यावती सेवा सदन येथे घेण्यात आले.
या शिबीराचे उद्घाटन मा.श्री. सचिन कलंत्रे, आयुक्त, मनपा, अमरावती यांच्या शुभहस्ते करण्यातआले. शिबीरास संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.प्रविण मालपाणी यांची अध्यक्ष म्हणुन उपस्थित होते विशेष अतिथी म्हणून श्री. राजेश मोडक असिस्टंट जनरल मॅनेजर, ई.सी.जी.सी.मुंबई, प्रमुख अतिथी महणून मा.श्रीमती माया केदार, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, अमरावती, श्री.डी.एम.पुंड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प. अमरावती व श्री. दिनेश के. बहल, हेड ऑफ द.सस्टनेबल डीपार्टमेंट अॅन्ड पार्टनरशिप, टॉचर्चीस्ट ईलेक्ट्रॉनिक प्रा. लिमीटेड, अहमदाबाद, गुजरात इत्यादी अतिथी उपस्थित होते.
सारथी स्मार्ट केन ही एक इलेक्ट्रॉनिक्स काठी असुन दृष्टीबाधीतांच्या चलन वलनाकरीता अत्यंत उपयुक्त आहे. ही काठी अंध व्यक्तीला 3 मिटर लांबच्या अंतरावर असलेल्या अडवडयांची पूर्व सुचना देते. आणि होणा-या संभाव्य धोक्यापासून वाचविते. तसेच ज्योती स्मार्ट गॉगल हा इलेक्ट्रॉनिक्स चष्मा असुन हा दृष्टीबाधीतांच्या स्मार्ट भ्रमणध्वनीला जोडला जातो.व 300 प्रतिमा (ईमेजेस) तो त्यांना वाचुन दाखवितो त्यामुळे दृष्टीबाधीतांना प्रवास करणे, अभ्यास करणे व इतर कामे करणे सोईस्कर होते.या सर्व बाबींचे प्रशिक्षण श्री. दिनेश बहेल यांनी उपस्थित लाभाध्यांना दिले. 500 दृष्टीबाधीत दिव्यांग व्यक्तींनी या शिबीराचा लाभघेतला. 300 सारथी स्मार्ट केन व 200 ज्योती ए.आय. स्मार्ट गॉगल च्या खरेदीकरीता रुपये 48,00,000/- लक्ष इतक्या रकमेचा निधी लागला जो निधी एक्सपोर्ट क्रेडीट गॅरन्टी कापोरेशन ऑफ इंडीया, मुंबई (एउॠउ) या कंपनीमार्फत उपलब्ध करुन देण्यात आला. शिबीरास संस्थेचे सचिव अॅड. प्रदीप श्रीवास्तव, कोषाध्यक्ष सदस्य श्री.सुनिल सरोदे, कार्यकारिणी सदस्य श्रीमती उर्मी शहा, सौ. प्रभा झंवर राजेश डागा,व्यवस्थापक अधिक पंकज जी. मुद्दगल आणि शाळा व कर्मशाळेचे शिक्षक-कर्मचारी उपस्थित होते. शिबीराचे संचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री.एन.एस. इंगोले व आभार प्रदर्शन श्रीमती वनीता डोंगरे यांनी केले. शिबीराच्या यशस्वीतेकरीता डॉ. नरेन्द्र भिवापुरकर अंध विद्यालय, अमरावती, आश्रित अंध कर्मशाळा अमरावती व स्वामी विवेकानंद अंध विद्यालय, परतवाडा येथील शिक्षक व कर्मचार्यांनी अथक परिक्षम घेतले. या आयोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.