न्यायालयाचे आदेश अन् सिंहगड संस्थेवर मोठी कारवाई

मुंबई/13 नोव्हेंबर– शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांचे वर्षानुवर्षे थकलेले वेतन, संस्थेच्या कारभारातील कथित अनियमितता आणि कर्मचार्यांची आर्थिक कोंडी.. अशा गंभीर प्रश्नांमुळे चर्चेत असलेल्या पुण्यातील सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीला आता मोठा दणका बसला आहे.
कर्मचार्यांच्या वेतनप्रश्नी दाखल याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण संचालनालयाने कठोर पाऊल उचलले आहे. सिंहगड संस्थेच्या महाविद्यालयांवरील व्यवस्थापनाची जबाबदारी आता प्रशासकांकडे सोपवण्यात आली आहे.





