उपमुख्यमंत्री सुनेत्रा अन् पार्थ पवारांसोबत बैठक
राष्ट्रवादीच्या आमदारांचे विलीनीकरणावर स्पष्टीकरण

पुणे /13 नोव्हेंबर : राज्यात पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा सुरु झाली आहे. अशामध्ये राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या आहेत. अशामध्ये शुक्रवारी (13 नोव्हेंबर) पुण्यातील जिजाई बंगल्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राज्यसभा खासदार पार्थ पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे पदाधिकारी आणि ठराविक आमदारांची बैठक बोलावली. यावेळी, या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं? याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजीच्या चर्चा तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांमध्ये पक्षाची ही बैठक महत्त्वाची असल्याचे बोलले जात आहे.
सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांच्या बैठकीत नेमकं काय घडलं? यावेळी विलीनीकरणावर चर्चा झाली का? याबाबत बैठकीत उपस्थित असलेल्या आमदारांनी मोठा खुलासा केला आहे. आमदार शंकर मांडेकर यावर म्हणाले की, आमची ही बैठक नव्हती. दरवर्षी दिवाळीनिमित्त आम्ही अजितदादांना भेटायला बारामतीला जात होतो. पण, अजितदादा गेल्यानंतर यावेळेस दिवाळी त्यांनी साजरी केली नाही. त्यामुळेच सुनेत्रा वाहिनी या कोनाल्याही भेटल्या नाहीत. त्या पुण्यात आल्या असल्यामुळे आम्हाला भेटायचे होते. यावेळी, विलिनीकरणावर काहीच चर्चा झाली नाही. आम्ही फक्त तीन आमदार होतो. तीन आमदार थोडीच विलिनीकरणावर चर्चा करणार असे म्हणत त्यांनी स्पष्टीकरण दिले.बैठकीनंतर आमदार माऊली कटके म्हणाले की, दरवर्षी दिवाळी पाडव्याला आम्ही दादांना भेटण्यासाठी बारामतीला जात असतो. यावेळेस अजितदादा नसल्यामुळे वहिनींना भेटण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. त्याच्यामध्ये विधानसभा आणि पुणे जिल्ह्याची दुष्काळग्रस्त जी परिस्थिती आहे त्या संदर्भात आढावा एक त्या ठिकाणी घेण्यात आला. मला कोणताही फोन आलेला नाही, शरद पवारांच्या भेटीसंदर्भात सांगता येत नाही. बाकी कोणतीही चर्चा झाली नाही, दिवाळीची सदिच्छा भेट आणि दुष्काळी परिस्थितीबाबत चर्चा झाली, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. बैठकीमध्ये उपस्थित असलेले आमदार सुनील शेळके यांना सुनील तटकरे यांच्याबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. सुनील तटकरेंना कोण विलन करत आहे? गेल्या आठवण्यात आठवड्यात आमची देवगिरीवर बैठक झाली.





