राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारमध्ये महाराष्ट्राचा डंका

राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण

दिव्या-तेजस्विनसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार

पॅरा-क्रीडा क्षेत्रातील दोन खेळाडूंचाही गौरव

नवी दिल्ली/13 नोव्हेंबर– शुक्रवारी राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या दिमाखदार समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील 17 गुणवंत खेळाडूंना प्रतिष्ठेच्या ‘अर्जुन पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राच्या युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुख आणि विदित गुजराथी यांच्यासह डेकाथलीट तेजस्विन शंकर, बॅडमिंटनपटू गायत्री गोपीचंद आणि त्रिसा जॉली यांचा समावेश आहे.
मात्र, यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमध्ये देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान असलेल्या ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न’ पुरस्कारासाठी एकाही खेळाडूची निवड न झाल्याने क्रीडा वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. 2014 नंतर दुसर्‍यांदा असा प्रसंग घडला असून, प्रत्येक अर्जुन पुरस्कार विजेत्याला प्रत्येकी 15 लाख रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.
20 वर्षीय दिव्या देशमुखने बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरण्याचा इतिहास रचला आहे, तर विदित गुजराथी 2024 मधील बुद्धिबळ ऑलिम्पियाड सुवर्णपदक विजेत्या संघाचा महत्त्वाचा सदस्य होता. तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता तेजस्विन शंकर, बॉक्सर नरेंद्र बेरवाल, कर्णबधिर नेमबाज धनुष श्रीकांत आणि पॅरा-क्रीडा क्षेत्रातून सुवर्णपदक विजेते एकता भ्यान व नेमबाज रुद्रांश खंडेलवाल यांनाही अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले.

Back to top button