राज्यस्तरीय पुरुष व महिला क्रिकेट स्पर्धा

उपमहापौर सचिन भेंडे यांच्या हस्ते उद्घाटन

 अखिल भारतीय कलाल समितीतर्फे आयोजन

अमरावती/13 नोव्हेंबर  : अखिल भारतीय कलाल समितीतर्फे आयोजित राज्यस्तरीय पुरुष व महिला क्रिकेट स्पर्धेला अमरावती महानगर पालिकेचे उपमहापौर सचिन भेंडे यांनी रवी राणा व नवनीत राणा यांच्यावतीने उपस्थिती दर्शविली. यावेळी त्यांनी खेळाडूंचे मनोबल वाढवून स्पर्धेसाठी आयोजक कलाल समितीचे कौतुक केले व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सुनील खराटे, शहर सुधार समितीच्या सभापती रार्धा कुरील, योगेश विजयकर, संजय कलाल, शंकर दुधाने, नानासाहेब पहाडे, सुनील राऊत, सुरेंद्र जयस्वाल, नानासाहेब धुमाळे, रेखाताई पिपळारे यांच्यासह समितीचे पदाधिकारी व अनेक मान्यवर उपस्थित होते.

Back to top button