अकोल्यात 11 लाखाचा एम.डी. ड्रगचा साठा जप्त

नार्को स्ट्राइक अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 2 आरोपी ताब्यात

अकोला/13 नोव्हेंबर– स्थानिक गुन्हे शाखा पथकास 11 नोव्हेंबर रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीत बिर्ला रेल्वे कॉलनी येथे एक इसम एम.डी. अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगून आहे. सदर माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकार्‍यांना तात्काळ अवगत करण्यात आले.
त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बिर्ला रेल्वे कॉलनी परिसरात नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई राबवून ऑपरेशन प्रहार – नार्को स्ट्राइक अंतर्गत कारवाई करून आरोपी शेख कासम शेख आजम, वय 25 वर्षे,रा. हमजा प्लॉट अकोला व गुलाम तोफिक कामरान गुलाम रफिक, रा. नवाबपुरा, अकोला यांना ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून आरोपीची पंचा समक्ष झळती घेण्यात आली झळती दरम्यान आरोपींजवळ पांढर्‍या रंगाची पावडर असलेली प्लास्टिक पिशवी मिळून आली सदर पदार्थाची प्राथमिक तपासणी केली असता तो एम. डी. अमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले. सदर अमली पदार्थाचे वजन 56 ग्रॅम असल्याचे आढळून आले ज्याची अंदाजे किंमत 11,20,000/- रु. तसेच आरोपींकडे अँड्रॉइड मोबाईल, 10,000 रुपये असा मुद्दे एकूण 11,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर आरोपींवर रामदास पेठ पोलीस स्टेशन अकोला येथे अपराध क्रमांक 609/26 व कलम23(ल),इ(ल) छऊझड -लीं अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कार्यवाही ही अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, स. पो. नि. निलेश देशमुख, अनिल चव्हाण, पोलीस अंमलदार शेख हसन, भास्कर धोत्रे, अब्दुल माजिद, खुशाल नेमाडे, वसीमुद्दीन, एजाज अहमद, विलास बंकावार, राहुल गायकवाड, श्रीकांत पातोंड, मोहम्मद आमीर, मंगेश नागापुरे, अशोक सोनवणे, भीमराव दिपके तसेच चालक मनीष ठाकरे यांनी केली आहे.

Back to top button