श्रीकृष्ण मंडळात त्रिशुंड गणपतीची स्थापना
यावर्षी पुण्यातील प्राचीन मंदिराचा आकर्षक देखावा

अष्टविनायकासह प्रमुख गणेशस्थळांचे दर्शन
अमरावती/15 सप्टेंबर– श्रीकृष्ण गणेश मंडळात यंदाच्या गणेशोत्सवासाठी पुण्यातील प्रसिद्ध त्रिशुंड गणपती मंदिराची हुबेहुब प्रतिकृती साकारण्यात आली आहे. सोमवारी माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख आणि डॉ. सोनाली देशमुख यांच्या हस्ते विधिवत पूजन करून गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली. यावेळी जय देव जय देव जय मंगलमूर्तीच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
अष्टविनायकासह प्रमुख गणेश मंदिरांचे दर्शन एकाच ठिकाणी घडावे, या उद्देशाने मंडळाने यंदा विशेष संकल्पना राबविली आहे. त्रिशुंड गणपती मंदिराच्या प्रतिकृतीमुळे भाविकांचे लक्ष वेधले जात असून आरतीच्या वेळी मोठी गर्दी होत आहे. मंडळाचे मार्गदर्शक कोमल बोथरा, मिलिंद चिमोटे, राजेश अग्रवाल, मंगेश गुढे, अॅड. सुनील पडोळे, संतोष अग्रवाल, धीरेंद्र धामोरिकर आणि सोहन कलंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले. पूजा समितीत गोपाल बियाणी, विजय डागा, गोपाल झंवर यांच्यासह अध्यक्ष मोहित शॉफ, उपाध्यक्ष मोहित अग्रवाल, सचिव तनय नांगलिया, कोषाध्यक्ष यश राठी, सहसचिव ऋषि घाडगे, अनुराग बोबडे आणि सहकोषाध्यक्ष लवेश विश्वकर्मा यांचा सहभाग आहे. कार्यकारिणीतील सदस्यांसह महिला वर्गानेही उत्स्फूर्त सहभाग घेतला. गणेशस्थापनेनंतर पाचव्या दिवशी अथर्वशीर्षाचे सामूहिक पठण होणार आहे. दरम्यान, त्रिशुंड गणपती मंदिराचे बांधकाम 1754 मध्ये सुरू होऊन 1770 मध्ये पूर्ण झाले. तपस्वी भीमगिरीजी गोसावी यांनी हे मंदिर उभारल्याचे सांगितले जाते. मंदिरातील दुर्मीळ गणेशमूर्ती विशेष आकर्षण ठरते.





