ऐन गणेशोत्सवात पेट्रोल-डिझेल भडकणार

सौदीतील तेल पाईपलाईनवर भीषण हल्ला

नवी दिल्ली/14 सप्टेंबर  : जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भडका उडाला असून अर्थव्यवस्थेवर याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सौदी अरेबियाच्या पूर्व-पश्चिम तेल पाइपलाइनवर हुती बंडखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर ही पाइपलाइन बंद करण्यात आली आहे. यामुळे जगातील चार टक्के तेल पुरवठा धोक्यात आला आहे. या संघर्षाच्या घडामोडीनंतर सोमवारी ब्रेंट क्रूडचा भाव 2.90 डॉलरने (2.77%) वाढून 107.51 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला. तर अमेरिकन डब्लूटीआय क्रूड 2.27 डॉलरने (2.27%) वाढून 102.32 डॉलर प्रति बॅरल झाले. बाजार उघडताच दोन्ही कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये 3 टक्क्यांहून अधिक उसळी पाहायला मिळाली.
आखाती देश आणि इराण यांच्यात सोमवारी ’स्ट्रेट ऑफ होर्मुज’बाबत होणारी महत्त्वाची बैठक तहकुब करण्यात आल्याची माहिती ओमानने दिली आहे

Back to top button