वाहतूक समस्यांवर तातडीच्या उपाययोजना करा
उपमहापौर सचिन भेंडे यांच्या निवेदनाची तहसिलदारांकडून दखल

अमरावती/27 नोव्हेंबर : शहरातील वाढत्या वाहतूक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश तहसिलदारांकडून देण्यात आले आहेत. यासंदर्भात अमरावती शहराचे पोलीस आयुक्त आणि वाहतूक व नियंत्रण विभागाचे सहआयुक्त यांना पत्र पाठविण्यात आले आहे. ?
अमरावती शहरातील वाहतुकीच्या समस्यांबाबत महानगरपालिकेचे उपमहापौर सचिन भेंडे व इतरांनी तहसिलदारांकडे निवेदन सादर केले होते. या निवेदनाची दखल घेत तहसिलदाराने संबंधित यंत्रणांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. या पत्रानुसार, शहरातील वाहतूक समस्यांबाबत संबंधित घटकांची बैठक आयोजित करून प्राथमिक स्तरावर आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री, उपमहापौर सचिन ओंकारराव भेंडे व इतर संबंधितांना सादर करावा.





