समान नागरी कायद्याबाबत अमरावती विभागात 29 ला जनसुनावणी
नागरिकांना मते मांडण्याची संधी, संबंधित गट, संस्था व नागरिकांनी सहभागी व्हावे-नयना गुंडे यांचे आवाहन

अमरावती /27 नोव्हेंबर : समान नागरी कायद्याबाबत (यूसीसी) नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी अमरावती विभागात रविवार 29 नोव्हेंबर 2026 रोजी विभागीय स्तरावर विभागीय जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. या जनसुनावणीत हितसंबंधित गट, संस्था यांचे प्रतिनिधी तसेच नागरिकांनी निर्धारित दिवशी व निर्धारित वेळेत उपस्थित राहून आपली मते मांडावीत, असे आवाहन अमरावतीचे विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे. अमरावती महसूल विभा गातील जन सुना वणीचे आयोजन रविवार 29 नोव्हेंबर रोजी अमरा वती विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात करण्यात आले आहे. सुनावणीचे नियोजन जिल्हानिहाय करण्यात आले असून 29 नोव्हेंबर रोजी अकोला जिल्ह्यासाठी सकाळी 11 ते 12 या वेळेत, वाशिम जिल्ह्यासाठी सकाळी 12.30 ते दुपारी 1.30 या वेळेत, बुलढाणा जिल्ह्यासाठी दुपारी 2.30 ते दुपारी 3.30 या वेळेत, यवतमाळ जिल्ह्यासाठी दुपारी 4 ते सायंकाळी 5 या वेळेत आणि अमरावती जिल्ह्यासाठी सायंकाळी 5.30 ते सायं. 6.30 या वेळेत जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. संबंधित गट, संस्था यांचे प्रतिनिधी आणि नागरिक यांना नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती किंवा संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय येथे निर्धारित दिवशी,निर्धारित वेळेपुर्वी 1 तास आधी सुनावणीकामी समक्ष उपस्थित राहता येईल. नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथील उपस्थितांची सुनावणी समितीसमोर समक्ष घेण्यात येईल व संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहणार्या नागरीकांची सुनावणी व्हि.सी.व्दारे घेण्यात येईल. ज्या नागरिकांना केवळ ऑनलाईन पद्धतीने मते नोंदवायची आहेत त्यांना महाराष्ट्र शासनाच्या या समान नागरी कायदा पोर्टलॠ वर 37 मुद्यांची माहिती देता येईल, असेही कळविण्यात आले आहे.





