कत्तलीसाठी घेवून जाणार्या पाच जनावरांना जीवदान
नागपुरी गेट पोलीसांची कारवाई

2 लाख 96 हजारांचा ऐवज जप्त
अमरावती/27 नोव्हेंबर – नागपूर गेट पोलिसांनी शहरातील नीलम नगर परिसरात कारवाई करत टाटा एस वाहनातून कत्तलीसाठी निर्दयतेने कोंबून नेली जात असलेल्या 5 वासरांची सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी जनावरांसह 2 लाख 96 हजार रुपये किमतीचे वाहन जप्त केले असून, जनावरांची निर्दयतेने वाहतूक करणार्या अब्दुल वसीम अब्दुल मोहसिन (34, नीलम नगर निवासी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नागपूर गेट पोलिसांचे गुन्हे शोध पथक शुक्रवारी, 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता नीलम नगर परिसरात गस्त घालत होते. यावेळी एमएच-05/बीएच-5266 क्रमांकाचे टाटा एस वाहन भरधाव वेगाने जाताना दिसले. वाहनातून जनावरांची निर्दयतेने वाहतूक होत असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग करून वाहन थांबवले. तपासणी केली असता, वाहनात 5 वासरे दाटीवाटीने कोंबून भरल्याचे आढळले. जनावरांना हालचाल करण्यासही जागा नव्हती. पोलिसांनी तत्काळ वासरांना वाहनातून बाहेर काढून ताब्यात घेतले. सुटका केलेल्या वासरांना सुरक्षिततेसाठी नंदनवन परिसरातील गोशाळेत पाठवण्यात आले. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 281, महाराष्ट्र पशुसंवर्धन कायद्याच्या कलम 5 (अ), 5 (ब), प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या कलम 11 (1) (ड), 11 (1) (फ) आणि महाराष्ट्र पशू संरक्षण कायद्याच्या कलम 119 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त गाडगे, निरीक्षक मनोहर कोटनाके, विकास मनपिया यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
जनावरांच्या वाहतुकीवर पोलिसांचा धडक कारवाई
नागपूर गेट पोलिसांनी वाहनातून निर्दयतेने वाहतूक होणार्या 5 वासरांची सुटका केली. जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत 2 लाख 96 हजार रुपयांचे वाहन जप्त करण्यात आले. जनावरांची बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवली आहे.





