हवाई दलाच्या तळावर हल्ल्याचा कट उधळला
वडोदरा मधून जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला अटक

रायफल आणि 23 जिवंत काडतुसे जप्त
वडोदरा/27 नोव्हेंबर : गुजरात दहशतवादविरोधी पथकाने वडोदरा येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर हल्ला करण्याचा एक मोठा कट उधळून लावला असून, जैश-ए-मोहम्मदच्या एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. हा संशयित अघ-47 सारख्या स्वयंचलित रायफलने हल्ला करण्याची योजना आखत होता. एटीएसने त्याच्याकडून शस्त्रे, दारुगोळा आणि जैश-ए-मोहम्मदच्या झेंड्यासह अनेक वस्तू जप्त केल्या आहेत.
गुजरात एटीएसचे डीआयजी सुनील जोशी यांनी शुक्रवारी (27 नोव्हेंबर 2027) सांगितले की, अटक करण्यात आलेला संशयित मोहम्मद इस्लाम कबीरुद्दीन हा आसामचा रहिवासी आहे. वडोदर्याला येण्यापूर्वी त्याने त्याचा रोजचा मोबाईल फोन बंद ठेवला होता आणि तो तेथील एका हॉटेलमध्ये थांबला होता. जैश-ए-मोहम्मदशी संबंधित दुसर्या राज्यातील एक व्यक्ती स्वयंचलित रायफल घेऊन गुजरातमध्ये एका सुरक्षा केंद्रावर हल्ला करण्यासाठी येत असल्याची विशिष्ट माहिती एटीएसला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, एटीएसने पाळत वाढवली आणि त्याला अटक केली.डीआयजी सुनील जोशी यांच्या म्हणण्यानुसार, आरोपीच्या बॅगेची झडती घेतली असता, त्यात -घ-47 प्रकारची स्वयंचलित रायफल, दोन रिकामी मॅगझिन्स, 23 जिवंत काडतुसे, जैश-ए-मोहम्मदचा झेंडा, एक मोबाईल फोन, एक सिम कार्ड आणि रोख रक्कम सापडली. प्राथमिक तपासात कबीरुद्दीनचा हँडलर म्हणून मुफ्ती रफीक ऊर्फ इब्न अब्दुल्ला याची ओळख पटली आहे, जो कथितरित्या जैश-ए-मोहम्मदशी संबंधित आहे.एटीएस अधिकार्याने सांगितले की, हँडलरने आरोपीला हल्ला करण्यासाठी 50 हजार रुपये दिले होते. या पैशांचा वापर नवीन मोबाईल फोन खरेदी करण्यासाठी, प्रवास आणि हॉटेलचा खर्च भागवण्यासाठी, तसेच हल्ल्यानंतर पळून जाण्याच्या तयारीसाठी करण्यात आला. तपास यंत्रणेनुसार, हल्ला केल्यानंतर कबीरुद्दीन पाकिस्तानला जाण्याचा विचार करत होता. त्याच्यावर ण-झ- आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला सध्या न्यायालयात हजर केले जात आहे.





