अमरावतीच्या महिला क्रिकेट संघाची आंतरविद्यापीठ स्पर्धेत दमदार कामगिरी
पहिल्या डावात 25 धावांची आघाडी

प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश
अमरावती /27 नोव्हेंबर- अमरावती विद्यापीठाच्या महिला क्रिकेट संघाने आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धेत दमदार कामगिरी करत प्रतिस्पर्धी संघांना पराभूत केले. पहिल्या सामन्यात 25 धावांची आघाडी घेत विजय मिळविल्यानंतर संघाने पुढील सामन्यातही एक गडी राखून बाजी मारली. सलग विजयामुळे अमरावतीच्या मुलींनी स्पर्धेत आपले स्थान मजबूत केले असून, त्यांच्या कामगिरीचे क्रीडा क्षेत्रातून कौतुक होत आहे.
पहिल्या सामन्यात अमरा वतीच्या संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. फलंदाजांनी धावसंख्या उभारण्यासाठी चांगली मेहनत घेतली, तर गोलंदाजांनी प्रतिस्पर्ध्यांना रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ग्रिश्मा तट्टे हिने शानदार फलंदाजी करत 58 धावांची खेळी केली. तिच्या दमदार खेळीमुळे संघाला 20 षटकांत 135 धावांपर्यंत मजल मारता आली. प्रत्युत्तरात भोपालच्या संघाने प्रयत्न केले; मात्र अमरावतीच्या गोलंदाजांनी त्यांना 110 धावांवर रोखत 25 धावांनी विजय मिळवला. दुसर्या सामन्यात अमरावतीच्या संघाने मुंबई विद्यापीठाला 3 गडी राखून हरवले. त्यानंतर एलएनआयपीई, ग्वाल्हेर संघावर मात केली. सातत्यपूर्ण खेळामुळे संघाने स्पर्धेत आगेकूच केली. ग्रिश्मा तट्टेच्या शानदार कामगिरीची दखल घेत तिला सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. प्रशिक्षक डॉ. विनोद कापिले आणि व्यवस्थापक प्रताप नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने हे यश मिळवले.





