लोकेश चंद्र यांना ‘एनर्जी लिडरशिप अवॉर्ड’
एनर्जी लिडरशिप परिषदेत अपर मुख्य सचिव

महावितरणला ’“अॅरडॉप्टिंग एआय इन एनर्जी’ पुरस्कार
अमरावती/11 सप्टेंबर -कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा अत्यंत प्रभावी वापर करत शेतीला दिवसा वीज पुरवणे आणि वीज खरेदीत तब्बल 1200 कोटी रुपयांची ऐतिहासिक बचत केल्याबद्दल महावितरणचा आणि अध्यक्ष लोकेश चंद्र यांचा नवी दिल्लीत राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी भव्य गौरव करण्यात आला.नवी दिल्ली येथे पार पडलेल्या ’6 व्या ईटी ऊर्जा नेतृत्व परिषदेत’ निवृत्त केंद्रीय ऊर्जा सचिव अनिल राजदान यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना ’ऊर्जा नेतृत्व पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. याच वेळी अचूक वीज मागणी अंदाजासाठी तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल महावितरणला ’अडॉप्टिंग एआय इन एनर्जी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार लोकेश चंद्र यांच्यासह महावितरणचे कार्यकारी संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता संतोष सांगळे आणि मुख्य महाव्यवस्थापक भूषण कुलकर्णी यांनी स्वीकारला.
महाराष्ट्रात सौर ऊर्जेच्या माध्यमातून ग्रामीण अर्थकारण बळकट होत असून शेतीचे चित्र बदलत आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून 6,250 मेगावॉट क्षमतेचे प्रकल्प पूर्ण झाले असून 17 लाख 52 हजार शेतकर्यांना आता दिवसा वीज मिळत आहे. ’पंतप्रधान कुसुम-बी’ योजने अंतर्गत देशातील एकट्या महाराष्ट्रात 65 टक्के म्हणजेच 11 लाख 54 हजार सौरपंप कार्यान्वित झाले आहेत. ’पंतप्रधान सूर्यघर’ योजनेत 7 लाख 77 हजार घरांवर सौर संच बसवून 2,947 मेगावॉट वीजनिर्मिती सुरू झाली आहे. महावितरणने 12 सप्टेंबर 2024 पासून स्वयंचलित एआय तंत्रज्ञान सुरू केले. यामुळे वीज खरेदीचा खर्च कमी होऊन महावितरणची 1200 कोटी रुपयांची घसघशीत बचत झाली आहे. या दैदिप्यमान यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आणि अप्पर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी लोकेश चंद्र यांच्यासह महावितरणच्या संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन केले आहे. एआय तंत्रज्ञानाची मोठी किमया महावितरणने लागू केलेल्या स्वयंचलित कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे विजेची मागणी व पुरवठ्याचे तंतोतंत नियोजन शक्य झाले आहे. यामुळे वीज खरेदीच्या खर्चात प्रचंड घट होऊन महावितरणची आजवर 1200 कोटी रुपयांची बचत झाली असून ग्राहकांनाही वीजदरात मोठा दिलासा मिळत आहे.सौर प्रकल्प पूर्ण झाले असून 17 लाख 52 हजारांवर शेतकर्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे.यासोबतच पीएम कुसुम-बी अंतर्गत देशात आजमितीस 17 लाख 42 हजार सौर कृषिपंप कार्यान्वित झाले आहेत. त्यापैकी एकट्या महाराष्ट्रात तब्बल 65 टक्के म्हणजे 11 लाख 54 हजार सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत.





