आ.सुलभा खोडके यांनी केली रुग्णालयाची पाहणी

सुरक्षा व्यवस्थेवर उपस्थित केले प्रश्न, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांशी केली चर्चा

तीन नवजात बालकांच्या मृत्यूनंतर रुग्णालय प्रशासनाकडून घेतली माहिती

अमरावती /24 ऑगस्ट- येथील जिल्हा स्त्री रुग्णालय म्हणजेच डफरीन रुग्णालयाच्या नवजात शिशु गहन काळजी विभागात सोमवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आमदार सुलभा संजय खोडके यांनी तत्काळ रुग्णालयात पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी रुग्णालय प्रशासन, डॉक्टर आणि अधिकार्‍यांकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली तसेच बाधित मुलांच्या उपचारांची आणि सुरक्षा व्यवस्थांची पाहणी केली. रुग्णालय प्रशासनाकडून आमदार सुलभा खोडके यांना दिलेल्या माहितीनुसार, छखउण मध्ये एकुण तीन वेगवेगळे अतिदक्षता कक्ष आहेत.
ज्यांमध्ये प्रत्येकी 13-13 मुलांच्या उपचारांची व्यवस्था आहे. अशा प्रकारे या विभागाची एकूण क्षमता 39 नवजात शिशुंची आहे. घटना घडली त्या वेळी कक्षात 12 नवजात बालके दाखल होती. आग आणि धुरामुळे तीन बालकांचा मृत्यू झाला, तर इतर मुलांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. घटनेनंतर उर्वरित बालकांना खबरदारी म्हणून जवळच असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर आमदार सुलभा खोडके यांनी छखउण चे निरीक्षण करून पूर्ण परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी डॉक्टर आणि प्रशासकीय अधिकार्‍यांकडे आग लागण्याचे कारण, मदत व बचाव कार्य तसेच रुग्णालयाच्या सुरक्षेबाबत सविस्तर माहिती मागितली.ही अतिशय दुःखद आणि गंभीर घटना असून याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट केली पाहिजे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार सुलभा खोडके यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना या घडामोडीची माहिती दिली. आ.सुलभा खोडके यांनी आरोग्यमंत्र्यांना सांगितले की, रुग्णालयाच्या नव्या इमारतीतील नवजात शिशु अतिदक्षता विभाग सुमारे एका वर्षापूर्वीच सुरू करण्यात आला होता; परंतु आपत्कालीन सुरक्षा व्यवस्था आणि अग्नि सुरक्षा प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. त्यांनी या प्रकरणी तत्काळ हस्तक्षेप करून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही घेतली माहिती

या दरम्यान आमदार सुलभा खोडके यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी फोनवरून संपर्क साधून घटनेची माहिती दिली. आगीच्या घटनेत तीन नवजात बालकांचा गुदमरून मृत्यू झाला असून परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचे त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना सांगितले.घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आणि आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विशेष दक्षता बाळगण्याचे निर्देश दिले. अमरावतीचे डफरीन रुग्णालय, इर्विन रुग्णालय आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील अग्निप्रबंधक व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची तत्काळ पुनरावलोकन (रिव्ह्यू) बैठक घेण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. सर्व रुग्णालयांमध्ये सुरक्षा उपकरणे, फायर अलार्म, स्प्रिंकलर सिस्टीम आणि आणीबाणीच्या वेळी बचाव यंत्रणा पूर्णपणे कार्यरत आहेत की नाही, याची तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी रुग्णालयांची सुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

Back to top button