हिमवृष्टीत अडकलेल्या 900 पर्यटकांची सुटका
भारतीय लष्कर आले देवदूताप्रमाणे धावून

आसाम/13 नोव्हेंबर – सिक्कीममध्ये मुसळधार हिमवृष्टी आणि कडाक्याच्या थंडीत, भारतीय लष्कराने पुन्हा एकदा आपले शौर्य आणि माणुसकीचे प्रदर्शन केले आहे.लष्करी जवानांनी पूर्व सिक्कीममधील नाथुला, बाबा धाम (शेरेथांग) आणि चांगू (त्सोमगो) सरोवराच्या परिसरात हिमवृष्टीमुळे अडकलेल्या 900 हून अधिक स्थानिक आणि पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. प्रतिकूल हवामान आणि गोठवणार्या थंडीचा सामना करत, जवानांनी मदत आणि बचाव कार्य केले आणि लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवले. भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सच्या जवानांनी बर्फात अडकलेल्या 250 हूननाधिक पर्यटकांच्या 300 हून अधिक वाहनांना सुरक्षितपणे दुसर्या मार्गाने वळवले. मुसळधार हिमवृष्टीमुळे रस्त्यावरील वाहतूक अवघड झाली होती.





