माझ्याशी चर्चेनंतर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत

राहुल गांधींचे पंतप्रधानांना पुन्हा थेट चर्चेचे आव्हान

मोदींनी फोन टॅप केल्याचा आरोप

नवी दिल्ली/13 नोव्हेंबर  : भाजपने सातत्याने काँग्रेसच्या आंदोलनांमागे परकीय शक्ती असल्याचे अनेकदा आरोप करण्यात आले आहेत. अशामध्ये शुक्रवारी (13 नोव्हेंबर) लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींच्या केंद्र सरकारने आपला फोन टॅप केला असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे यानंतर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनीदेखील माझाही फोन टॅप करण्यात आल्याचा गंभीर दावा केला आहे. त्यामुळे आता या दाव्यामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये त्यांनी म्हटले की, परकीय शक्तींच्या सांगण्यावरून कोण काम करत आहे. कोण देशद्रोही आहे आणि ते किती काळापासून देशद्रोही कारवायांमध्ये सामील आहेत. याबाबत मला माहिती आहे, त्याची माहिती माझ्या फोनमध्ये आहे, असा दावा राहुल गांधींनी यांनी केला आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना समोरासमोर जाहीर चर्चेचे आव्हान दिले. दोघांमध्ये समोरासमोर चर्चा झाली, तर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी राहणार नाहीत, असा दावाही राहुल गांधी यांनी केला.
भाजप संसदेत चर्चेसाठी तयार असताना ते सार्वजनिक चर्चेचा आग्रह का धरत आहेत? असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, भाजप म्हणते की चर्चा संसदेत होऊ शकते. पण, मला संसदेत बोलू दिले जात नाही. माझा मायक्रोफोनही बंद केला जातो. तुम्ही मला कृषी विधेयकांवर, मतचोरीवर, डखठ वर, चीनवर तसेच नरवणे यांच्या पुस्तकावर आणि एपस्टीनवर बोलू दिले नाही. मला समोरासमोर चर्चा हवी आहे. मला लांबलचक भाषणांची चर्चा नको, असेही ते पुढे म्हणाले. राहुल गांधींनी सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये ते म्हणाले की, अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची चर्चेसाठी परीक्षक म्हणून नियुक्ती केली तरी त्यांना कोणतीही हरकत नाही. पंतप्रधान एक देशद्रोही आहेत, हे सिद्ध करण्यासाठी मला फक्त 5 मिनिटे लागतील. असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

Back to top button