‘स्कायनेक्स एअरो फ्लाइंग ट्रेनिंग स्कूल’चे उद्घाटन

खा.अनुप धोत्रे यांच्या पुढाकाराने अकोला येथे

पुढील आठवड्यात सज्ज होणार

अकोला/13 नोव्हेंबर – खासदार अनुप धोत्रे यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि पाठपुराव्यामुळे शहरात स्कायनेक्स एअरो फ्लाइंग ट्रेनिंग स्कूल साकार झाली आहे.ही शाळा पुढील आठवड्यात पूर्णपणे कार्यान्वित होईल. या उड्डाण प्रशिक्षण शाळेमुळे, स्थानिक आणि आसपासच्या तरुणांना आता त्यांच्याच शहरात दर्जेदार वैमानिक प्रशिक्षण उपलब्ध होईल. विमानचालन क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी संधी ठरेल, तसेच यामुळे स्थानिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल. अकोला शहर आणि जिल्ह्यातील अनेक तरुण पायलट होण्यासाठी चेन्नई, हैदराबाद आणि बंगळूरला जातात. आता त्यांना इतरत्र कुठेही जाण्याची गरज भासणार नाही. उपलब्ध सुविधांमुळे, जागतिक दर्जाचे पायलट घडवण्याचे काम अकोल्यातच केले जाईल आणि त्यामुळे अकोल्यातच रोजगाराच्या संधी निर्माण होतील. माजी मंत्री संजय धोत्रे यांचे कार्य पूर्ण व्हावे यासाठी खासदार धोत्रे रेल्वे आणि केंद्र सरकारसोबत युद्धपातळीवर काम करून अकोला शहराच्या विकासाला गती देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांनी अकोल्यात एक छोटी विमानसेवा आणि दुहेरी इंजिन असलेले विमान सुरू करण्यासाठीही पावले उचलली आहेत, तसेच अकोला महानगरपालिकेने ई-बस सेवा देण्याचा ऐतिहासिक निर्णयही घेतला आहे. हवाई वाहतूक सुलभ करण्याच्या आणि स्पर्धेच्या युगात संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, खासदार अनुप धोत्रे, पालकमंत्री आकाश फंडकर, आमदार रणधीर सावरकर, महापौर शारदाताई खेडकर, समिती अध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली हे काम केले जाईल. खासदार महोदयांनी पायलट प्रशिक्षण केंद्र सुरू करून अंतराचा मार्ग सुकर केला असून, ते काम पूर्णत्वास आणण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या शाळेसाठीची सर्व आवश्यक तयारी पुढील आठवड्यात पूर्ण होईल आणि त्यानंतर लगेचच कामाला सुरुवात होईल. खासदार अनुप धोत्रे यांच्या या उपक्रमाचे तरुण आणि नागरिक दोघांकडूनही स्वागत होत आहे.

Back to top button