अवैद्य शस्त्र बाळगणारा आरोपी जेरबंद
देशी कट्टासह 1 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त

अकोला /4 नोव्हेंबर– स्थानिक गुन्हे शाखा च्या पथकास गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक बातमी मिळाली की, एक इसम हा नेहमी त्यांचे जवळ देशी कट्टा बाळगून शरीराविरुद्ध गंभीर गुन्हा करण्याचे उद्देशाने व लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने फिरत आहे. सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उमेरखान जाकीर खान वय 22 वर्षे रा. मेहमूद नगर, अकोट फाईल याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याच्याकडे एक लोखंडी गावठी देशी कट्टा असल्याचे सांगितले सदर माहितीवरून त्याच्याकडून एक लोखंडी बनावट कट्टा किंमत अं.40,000/- रु. व गुन्ह्यासाठी वापरलेल्या त्याचा एक मोबाईल कि. अं. 1,00,000/- रु. असा एकूण 1 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कलम 3,25 आर्म ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. सदर कार्यवाही ही अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक,ऍड. डि निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, स पो नि निलेश देशमुख, गोपाल जाधव, विष्णू बोडखे, माजिद पठाण, अनिल चव्हाण व पोलीस अंमलदार शेख हसन, उमेश पराये, सुलतान पठाण, भास्कर धोत्रे, अमित दुबे, अब्दुल माजिद, रवींद्र खंडारे, महेंद्र मलिये, किशोर सोनवणे, देवानंद खरात, प्रवीण लोखंडे यांनी केली आहे.





