अकोल्यात गलानी प्रतिष्ठानावर एफडीएची कारवाई

भेसळयुक्त तेलाचा साठा जप्त, परवाना निलंबित

अकोला /28 ऑक्टोबर – अन्न औषध प्रशासनाची भेसडीच्या संशयावरून मे. गलानी ग्रो प्रा. लि. अकोला या आस्थापनेची 27 ऑक्टोबर 2026 रोजी तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान मोहरी तेल आणि तीळ तेलामध्ये भेसळ असल्याचा संशय आल्याने तब्बल 1,110 किलो तेलाचा साठा, एकूण 3 लाख 28 हजार 200 रुपये किमतीचा जप्त करण्यात आला. याशिवाय सदर पिढीमध्ये तांत्रिक व्यक्ती नसणे, ऋडचड प्लॅन नसणे,र्छीीींळींळेपरश्र षरलीं चा अभिलेख नसणे, अन्नपदार्थाचे विश्लेषण अहवाल नसणे, ऋखऋज अभिलेख नसणे, साफसफाईचा अभिलेख नसणे, कच्चे अन्नपदार्थ चा अभिलेख नसणे, कच्चे व तयार अन्नपदार्थ रिश्रश्रशीीं वर न ठेवता जमिनीवर ठेवले असणे, खिडक्यांना बारीक जाळी नसणे, स्टॉक रजिस्टर नसणे याशिवाय विविध नियमांचे उल्लंघन आढळल्याने आस्थापनेचा परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे.
तपासणी दरम्यान अन्नसुरक्षा विभागाने विश्लेषण साठी तेलाचे चार नमुने घेतले. यामध्ये प्रीमियम मोहरी तेल, प्रीमियम तीळ तेल, सुटे मोहरी तेल, सुटे तीळ तेल या नमुन्यांच्या विश्लेषणातून तेलाच्या गुणवत्तेबाबत अधिक स्पष्टता येणार आहे. सदरची कारवाई अन्न औषध आयुक्त तुकाराम मुंढे, सचिन केदारे सह आयुक्त अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) देवानंद वीर अकोला यांच्या समवेत किशोर बोरचाटे अन्नसुरक्षा अधिकारी यांनी केली आहे.

Back to top button