पदवीधरच्या दोन जागा तुतारीने जिंकल्या

जयंत पाटलांचा भाजपला टोला

मुंबई /28 ऑक्टोबर : राज्यातील पाच विधानपरिषद निवडणुकांचे निकाल हाती आले असून दोन्ही शिक्षक मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर, तीन पैकी 2 पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत.
नागूपर पदवीधर मतदारसंघात भाजपला विजय मिळाला. त्यामुळे, 5 पैकी तीन जागा जिंकत भाजपा महायुतीने वर्चस्व मिळवले. मात्र, पुणे पदवीधर आणि मराठवाडा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार जिंकले आहेत. त्याच अनुषंगाने विजयाचा जल्लोष झाल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील (गरूरपीं रिींळश्र) यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. यावेळी, नितेश कराळे यांच्यावर केलेल्या कारवाईबाबतही खुलासा केला. पुणे पदवीधर मतदारसंघातून हर्षदा देशमुख आणि मराठवाड्यातून प्रतापसिंह पाटील यांचा विजय झाल्याने विधानपरिषद निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हे मोठं यश मिळालंय. विशेष म्हणजे, मराठवाड्यात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळाला. येथे प्रतापसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीच्या सतीश चव्हाण यांचा पराभव केला. त्यावर बोलताना, समाजातील भावनांचे विश्लेषण या सगळ्या निवडणुकीत दिसत असतं असे म्हणत जयंत पाटलांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टोला लगावला. बेकरी, महागाई आणि स्पर्धा परीक्षेत सुरू असलेला त्रास आणि ती चीड पदवीधरांनी मतदानातून व्यक्त केली. हर्षदा जाधव देशमुख या सुशिक्षित पदवीधर युवा कार्यकर्त्या उमेदवार आहेत. तर, मराठवाड्यात प्रताप पाटील विजयी झाले आहेत. निवडणुकांमध्ये मतदानासाठी पानभर पत्रिका होती, त्यामुळे 10 मतं पडली तरी मोजावी लागतात. बॅलेटवर जेव्हा मतदान होतं तेंव्हा विरोधी पक्ष विजयी होतो, असे म्हणत जयंत पाटील यांनी विधानपरिषद निवडणुकीतील विजयानंतर सत्ताधार्‍यांना पुन्हा ईव्हीएमवरुन लक्ष्य केलं. तसेच, शिक्षक व पदवीधर मतदार संघात मोठ्या प्रमाणात आमिष दाखवून मते घेण्याचा प्रयत्न झाला

Back to top button