काँग्रेसचे अभिजित वंजारी विजयी

नागपूर पदवीधरमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचा गढ ढासळला

भाजपाचे सुधाकर कोहळे यांचा धक्कादायक पराभव

नागपूर /28 ऑक्टोबर ; राज्यातील सत्ताधारी भाजपासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या आणि संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघामध्ये अखेर भाजपाला नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला आहे. येथे पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये आघाडीवर असलेले पण मतांचा आवश्यक कोटा पूर्ण करण्यात अपयशी ठरलेले भाजपाचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांनी दुसर्‍या पसंतीच्या मतांच्या मोजणीमध्ये धोबीपछाड दिला. तसेच विजयाची औपचारिक घोषणा झाली नसली तरी मतमोजणीत निर्णायक आघाडी घेतल्यानंतर अभिजित वंजारी यांनी कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा स्वीकार केला.
दुसर्‍या पसंतीच्या मनमोजणीवर जय पराजयचा निर्णय झालेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांच्या मतांमध्ये मिळालेली दुसर्‍या पसंतीची मते अभिजित वंजारी यांच्या विजयात निर्णयाक ठरली. या मतांच्या जोरावर अभिजित वंजारी यांनी सुधाकर कोहळे यांनी पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीमध्ये मिळवलेली 4 हजारांहून अधिक मतांची आघाडी मोडून काढली आणि वर निर्णायक आघाडी घेत विजय निश्चित केला.या विजयानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अभिजित वंजारी म्हणाले की, गेल्या सहा वर्षांमध्ये मी या पदवीधर मतदारसंघामध्ये मी जे काम केलं, त्या कामाची पोचपावती मला या विजयाच्या माध्यमातून मिळाली आहे. सगळ्या संघटना शिक्षक संघटना माझ्या पाठीशी होत्या. त्यामुळे आमचा विजय निश्चित होता, असे अभिजित वंजारी यांनी सांगितले.
यावेळी दुसर्‍या पसंतीक्रमाच्या मतांमधून झालेल्या विजयाबाबत अभिजित वंजारी पुढे म्हणाले की, जो जिता वही सिकंदर, देशात, मतदारसंघात अनेक मुद्दे आहेत. तसेच तसेच भाजपा ज्या प्रकारचं राजकारण करत आहे, त्याविरोधात मतदारांनी दिलेला हा जनादेश आहे.
यावेळी नितेश कराळेंबाबत प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, नितेश कराळे हा आमचा लहान भाऊ आहे. आमचा मित्र आहे. तसेच त्यांना मिळालेली 25 हजार मते कुणाचीही असली तरी विजय आमचा झाला हे आम्हाला माहिती आहे. तसेच त्यांना मिळालेली दुसर्‍या पसंतीची मते ही आमच्या रणनीतीचा भाग आहेत. मी पहिल्या पासून सांगत होतो की ही प्रचारापेक्षा रणनीतीची निवडणूक आहे. कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते. ती म्हण आज खरी ठरली आहे. तसेच आमचा विजय झाला आहे.

Back to top button