मतचोरी विरोधात अमरावतीत युवक काँग्रेसचा विराट मोर्चा
निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराविरुद्ध पेटल्या मशाली

काँग्रेस भवनापासून आंबेडकर पुतळ्यापर्यंत बुलंद लढा
अमरावती /28 ऑक्टोबर– लोकशाही व्यवस्था आणि सामान्य जनतेच्या मतांच्या अधिकारावर गदा आणणार्या कारभाराविरोधात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीचा निषेध करण्यासाठी अमरावती जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने शहरात भव्य मशाल मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस भवन येथून निघालेल्या या विराट मोर्चाचा समारोप भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ झाला. या आंदोलनात पक्षाचे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील प्रमुख नेते, स्थानिक पदाधिकारी आणि शेकडो तरुण हातात धगधगत्या मशाली घेऊन मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेहोते.सामान्य मतदारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि निवडणूक यंत्रणेच्या मनमानी कारभाराविरुद्ध अमरावती शहरात युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला. बुधवारी सायंकाळी 6 वाजता काँग्रेस भवन येथून शेकडो कार्यकर्त्यांनी हातात पेटत्या मशाली घेऊन मोर्चाला सुरुवात केली. केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात दिलेल्या जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. शहरातील मुख्य रस्त्यांवरून मार्गक्रमण करत हा मोर्चा इर्विन चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचला. तेथे महामानवाला अभिवादन करून मोर्चाचा समारोप करण्यात आला. या वेळी नेत्यांनी जनतेच्या मतांचे रक्षण करण्यासाठी युवकांनी पुढे येण्याचे आवाहन केले.
या भव्य मशाल मोर्चात महाराष्ट्र प्रभारी अजय चिकारा, सहप्रभारी नवजोत सिंह संधू, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश उपाध्यक्ष अनुराग भोयर, कपिल ढोके, आमेर अब्दुल सलेम, जिल्हाध्यक्ष राहुल येवले, कार्याध्यक्ष अनिकेत ढेंगले, प्रदेश महासचिव निलेश गुहे, परीक्षित जगताप, नितेश वानखडे, रितेश पांडव, उत्कर्ष देशमुख, सागर कलाने, उपाध्यक्ष नितिन काळे, फजलूर कुरैशी, राधिका देशमुख, आयुषी देशमुख, कुणाल जतकर, अक्षय हेटे, अफजल बेरा, वैभव सरनाईक, शांतनु धोटे, राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सर्वेश खांडे, विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, पीयूष मालवीय, ऋग्वेद सरोदे, नीलेश डांगे, लोकेश पडोळे यांच्यासह युवक काँग्रेस व राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





