जिल्हा परिषद लिपिकांना पदोन्नतीची भेट

कुठे मविआकडून सत्ताधार्‍यांना धक्का, तर ‘या’ जागांवर महायुती आघाडीवर

मुंबई /27 ऑक्टोबर :  राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळपासून सुरू आहे. या मतमोजणीमध्ये सत्ताधारी महायुती आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये चुरस दिसून येत आहे. त्यातच अनेक ठिकाणी बरेच उमेदवार रिंगणात असल्याने झालेल्या विभाजनामुळे दुसर्‍या पसंतीची मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, या मतमोजणीमध्ये रात्री उशिरापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये पाच पैकी तीन जागांवर सत्ताधारी महायुतीचे उमेदवार आघाडीवर होते. तर दोन ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये नागपूर पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपाचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्यात अटीतटीची लढत दिसून येत आहे. येथे पहिल्या फेरीत अभिजित वंजारी यांनी आघाडी घेतली होती. मात्र दुसर्‍या फेरीत भाजपाचे सुधाकर कोहळे यांनी मुसंडी मारली असून, त्यांनी आघाडी घेतली आहे. येथे अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांनी मिळवलेली लक्षणीय मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
तर अमरावती शिक्षक मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक हे आतापर्यंतच्या मतमोजणीत पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये 8,162 मते घेत आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीच्या प्रा. अदिती पोहरे 4,688 मते घेत दुसर्‍या क्रमांकावर आहेत. तर शिंदेसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना 4,668 मते मिळाली असून त्यांना पोहरेंच्या तुलनेत अवघे 20 मते कमी आहेत. त्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची होत आहे. शिवाय दुसर्‍या पसंतीची मते निर्णायक ठरणार आहेत.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रतापसिंहआ. सुहास बाबर, आ. संतोष दानवे यांनी भक्कम साथ दिली.हा लढा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे मुख्य सचिव बापूसाहेब कुलकर्णी, राज्य अध्यक्ष सागर बाबर, राज्य सचिव अरूण जोर्वेकर, कोषाध्यक्ष उमाकांत सूर्यवंशी, कार्याध्यक्ष पंकज गुल्हाणे, संजय धोटे, सचिन मगर, उपाध्यक्ष संजय चव्हाण, मंत्रालय संपर्क प्रमुख विशाल पाटील, प्रकाश महाळुंगे, माजी अध्यक्ष गिरीश दाभाडकर, मारोती जाधव, लिपिक हक्क परिषदेचे अध्यक्ष विजय बोरसे, महेश गावंदरे, रणजीत कांबळे, संजय जगताप, विनायक जाधव, मनिषा देसाई, अनिता पाटील, सायली कुलकर्णी, वनराज पाटील, नागेश सांगळे, प्रमोद जाधव, गजानन नागरे, सुधाकर चोपकर, कमल दर्डा, अशोक कासराळीकर, प्रमोद निरगुडे, इंद्रजित जाधव, एस. एस. राऊत, एल. धुमाळ, विजय निकम, हेमंत कुमार यावले व राज्य कार्यकारिणी सदस्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.

Back to top button