दोन दिवसांत शेतकर्यांच्या खात्यात 5 हजार जमा होणार
शेतकर्यांपासून ते शिक्षण विभागापर्यंत मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

राज्यातील दीड कोटी शेतकर्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ
मुंबई /27 ऑक्टोबर : महाराष्ट्र सध्या महादुष्काळात होरपळत आहे. त्यामुळे सरकारकडून मदतीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 14 ऑक्टोबरला शेतकर्यांना 5 हजार रुपये मदत करणार असल्याची घोषणा केली होती. या संदर्भात आजच (27 ऑक्टोबर) राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेत 5 हजार रुपये अग्रीम म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय ही रक्कम दोन दिवसांत शेतकर्यांच्या खात्यात जमा केली जाईल, हेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी 5 हजार रुपये जमा होतील आणि दुष्काळात होरपळणार्या शेतकर्यांना दिलासा मिळेल, अशी सरकारला अपेक्षा आहे.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील 305 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. त्यामुळे दुष्काळाच्या सवलती देण्याची जबाबदारी सरकारची आहे. पण शेतकर्यांचा खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे शेतकर्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. शिवाय तोंडावर दिवाळीचा सण आहे. त्यामुळे शेतकर्यांना दिवाळीपूर्वी 5 हजार रुपये देण्याची घोषणा सरकारने दोन आठवड्यांपूर्वी केली होती. त्याचा निर्णय आजच्या (27 ऑक्टोबर) मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. शेतकर्यांना दोन दिवसांत म्हणजे गुरुवारपर्यंत (29 ऑक्टोबर) शेतकर्यांच्या खात्यात 5 हजार रुपये अग्रीम म्हणून जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.





