3 लाख कुटुंबांपर्यंत दिवाळीचा किराणा पोहोचविण्याचा संकल्प

पहिला टप्पा पूर्ण; 6,343 कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप

आ. रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या पुढाकारातून हनुमान नगर येथे उपक्रमाचा प्रारंभ

अमरावती /28 ऑक्टोबर– आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही कुटुंबाची दिवाळी अंधारात जाऊ नये, यासाठी आमदार रवी राणा आणि भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांच्या संकल्पनेतून यंदाही दिवाळी किराणा वाटप उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमातून राज्यातील 3 लाख कुटुंबांपर्यंत किराणा साहित्य पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात 6,343 कुटुंबांना किराणा साहित्य देण्यात आले. हनुमान नगर येथून या उपक्रमाचा प्रारंभ नवनीत राणा यांच्या हस्ते करण्यात आला.
दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण असला, तरी वाढत्या महागाईमुळे अनेक कुटुंबांना सणासाठी लागणार्‍या वस्तूंची खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागतो. अशा कुटुंबांना दिलासा मिळावा आणि त्यांच्याही घरात दिवाळीचा आनंद पोहोचावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हनुमान नगरसह केवल प्लॉट, कांडलकर प्लॉट, मावदे प्लॉट, दत्तुवाडी, आमलेवाडी, खोलापुरी गेट, जोशीवाडी आणि बाबा चौक परिसरातील कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. या पहिल्या टप्प्यात एकूण 6,343 कुटुंबांना मदत मिळाली. पुढील काळात अधिकाधिक गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. या कार्यक्रमाला उपमहापौर सचिन भेंडे, गटनेते नाना आमले, नगरसेवक प्रा. प्रशांत आनंदाराव वानखडे, संजय हिंगासपुरे, सुमती ढोके, अजय जयस्वाल, किशोर जाधव, दीपक साहू, नंदा सावदे, रजनी डोंगरे, गौरी मेघवानी, अ‍ॅड. प्रीती रेवणे, महेश मुलचंदानी, योगेश विजयकर, अर्चना पांडे, प्रियंका पाटणे आणि मीराताई कांबळे उपस्थित होते. याशिवाय आकाश तायडे, सुनील खराटे, नितीन बोरेकर, शहराध्यक्ष राजा बांगरडे, विनोद गुहे, अविनाश काळे, अशोक पांडे, भूषण पाटणे, आकाश पाटील, सुधीर वाघ, पवन दलवी, बबलू वानखडे, राजू अंबाडकर, सागर लोखंडे, पवार गुरुजी, पराग चिमोटे, शुभम उंबरकर, राजेश दातखोरे, आकाश राजगुरे, निखिल आखोटकर, पंकज गायकवाड, सुनील धांडे आणि संकेत गादे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button