24 कॅरेट सोन्याच्या वर्खात सजली शाही मिठाई

राजस्थानच्या कारागिरांच्या हातून साकारली अनोखी मिठाई

* पारंपरिक चवीसोबत आकर्षक भेटपेट्यांची खास मेजवान

अमरावती/4 नोव्हेंबर- दिवाळीचा सण म्हटला की मिठाई, भेटवस्तू आणि आप्तस्वकीयांसोबत आनंद साजरा करण्याची लगबग सुरू होते. यंदा या आनंदात शाही थाटाची भर घालण्यासाठी अमरावतीतील रघुवीर स्वीट अँड नमकीन यांनी 24 कॅरेट सोन्याच्या वर्खाने सजवलेली ‘स्वर्ण शंख’ ही खास मिठाई बाजारात आणली आहे. राजस्थानमधील कुशल कारागिरांनी तयार केलेली ही मिठाई बदाम, पिस्ता, शुद्ध केशर आणि सोन्याच्या वर्खामुळे लक्षवेधी ठरत आहे. प्रतिकिलो 24 हजार रुपये किंमत असलेल्या या मिठाईसोबत पारंपरिक चवीपासून आधुनिक गोड पदार्थांपर्यंत मोठी मेजवानी ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
‘रघुवीर – हिस्सा हर खुशी का’ या संकल्पनेतून प्रत्येक आनंदाच्या प्रसंगात सहभागी होण्याची परंपरा रघुवीरने कायम ठेवली आहे. देवी महालक्ष्मीला अर्पण केल्या जाणार्‍या प्रसादाच्या संकल्पनेतून ‘स्वर्ण शंख’ हे नाव देण्यात आले आहे. या मिठाईच्या निर्मितीसाठी उच्च दर्जाचे बदाम, पिस्ता, शुद्ध केशर आणि 24 कॅरेट सोन्याचा वर्ख वापरण्यात आला आहे. सोन्याच्या वर्खाची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली असून, अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे पालन करूनच ही मिठाई तयार केली जाते. राजापेठ पोलीस ठाण्याजवळील रघुवीर तसेच स्टेट बँकेजवळील दस्तूरनगर मार्गावरील गोड पदार्थांच्या शाखेत ही मिठाई उपलब्ध आहे. दिवाळीनिमित्त काजू तरबूज, काजू फुलवर, काजू बटरस्कॉच लाडू, काजू सफरचंद, गुलाब ब्लॉसम, आंबा ब्लॉसम, अंजीर कतली, काजू पान, काजू कतली, मोतीचूर लाडू, जिलेबी, दूध हलवा, मलाई रोल, मावा गुजिया, बेसन लाडू यांसह विविध प्रकारच्या मिठाई ग्राहकांसाठी सज्ज आहेत. मधुमेह असलेल्या ग्राहकांसाठी साखरमुक्त मिठाईचे पर्यायही उपलब्ध आहेत. भेटवस्तूंसाठी मुंबई, दिल्ली आणि इंदूर येथून खास तयार करून घेतलेल्या आकर्षक पेट्यांमध्ये मिठाई आणि सुका मेवा सजवण्यात आला आहे. मिठाईच्या पेट्या 305 रुपयांपासून, तर आकर्षक भेटसंच 350 ते 5 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. राजस्थान, बंगाल, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील पारंपरिक मिठाईंची चव एकाच छताखाली अनुभवता येत आहे. या उत्पादनांसाठी राजस्थानचे रामकरण ढिढारिया, प्रेमदास वैष्णव, पश्चिम बंगालचे संजय देहाटी, महाराष्ट्राचे नंदू मुनेश्वर आणि उत्तर प्रदेशचे मनीष यादव यांचे कौशल्य लाभले आहे. यावेळी पत्रकार परिषदेत चंद्रकांत पोपट, तेजस पोपट, वसंत ठक्कर, गोपाल पोपट, सुरेश वसानी, आकाश वसानी, रितेश बेलसरे यांच्यासह रघुवीर परिवारातील सदस्य उपस्थित होते.

Back to top button