धनत्रयोदशीला सराफा बाजारात धनवर्षा होणार
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; नाणी आणि मूर्तींना मोठी मागणी

अमरावती/4 नोव्हेंबर : धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक सराफा बाजारातील लहान-मोठे व्यापारी उत्साहात आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सोने आणि चांदीचे दर कमी झाले आहेत. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता प्रमुख ज्वेलरी शोरूममध्ये ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ग्राहकांची मोठी गर्दी होऊन कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चांदीच्या व्यापार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा चांदीची नाणी आणि मूर्तींच्या ऑर्डर मोठ्या प्रमाणात मिळाल्या आहेत. विशेषतः चांदीचे हत्ती आणि माशांच्या मूर्तींना मोठी मागणी आहे.
या मूर्तींचे काम अंतिम टप्प्यात असून, आकर्षक सजावटीने दुकानेही सजली आहेत. रंगीत कापड, फुलांचे गुच्छ आणि आकर्षक लाइटिंगमुळे शोरूममध्ये दिवाळीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील वर्षी चांदीचे दर प्रतिकिलो सुमारे तीन लाख रुपयांपर्यंत होते. यंदा ते 1.80 लाख रुपयांपर्यंत आल्याने ग्राहकांमध्ये चांदीच्या वस्तू खरेदीचा उत्साह वाढला आहे. तसेच सोन्याचे दरही प्रति दहा ग्रॅम दोन लाख रुपयांवरून कमी होऊन सुमारे 1.40 लाख रुपयांपर्यंत आले आहेत. त्यामुळे दागिन्यांसह लक्ष्मी-गणपती-कुबेरांच्या नाण्यांनाही मागणी वाढण्याची शक्यता आहे.
दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा-अमरावती मंडलने प्रमुख व्यापारी आणि पेढीचालकांशी चर्चा केली असता, यंदा दरात नरमाई आल्याने ग्राहकांचा प्रतिसाद चांगला राहील, असा विश्वास व्यापार्यांनी व्यक्त केला. जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या दरात चढ-उतार सुरू असून, सध्याचे दर खरेदीसाठी अनुकूल असल्याचे व्यापार्यांचे मत आहे.
एक टन चांदीच्या विक्रीचा अंदाज
सराफा व्यापारी आणि प्रमुख ज्वेलर्सकडे सुरू असलेल्या बुकिंगच्या आधारे यंदा धनत्र योदशीला अमरावतीत एक टनापेक्षा अधिक चांदीची विक्री होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच सोने, दागिने आणि बुलियन मिळून 25 किलोपेक्षा अधिक विक्री होण्याची अपेक्षा आहे. परंपरेनुसार अमरावतीकर आपल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या ज्वेलर्सकडूनच मुहूर्ताची खरेदी करण्यास प्राधान्य देतात.
ग्राहकांसाठी डिस्काउंट, फायदा घ्या
ुबडे ज्वेलर्सचे संचालक समीर कुबडे यांनी सांगितले की, सोने आणि चांदीचे कमी झालेले दर म्हणजे ग्राहकांसाठी मोठी संधी आहे. सध्या सोन्याचे दर पुन्हा दीड ते 1.60 लाख रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत जाऊ शकतात. त्यामुळे सध्याच्या दराचा ग्राहकांनी लाभ घ्यावा. कुबडे ज्वेलर्समध्ये मंथली जमा योजनेसह केवळ 5.99 टक्के मेकिंग चार्जेसची ऑफर उपलब्ध आहे.
सोन्याचे नाणे मोफत
सराफा बाजारातील माधुरी ज्वेलर्सचे संचालक महेश वर्मा यांनी सांगितले की, धनतेरस आणि दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्साह आहे. माधुरी ज्वेलर्समध्ये अडीच ग्रॅम सोन्याचे दागिने खरेदी केल्यास सोन्याचे नाणे मोफत देण्याची ऑफर देण्यात आली आहे. येथे सोने-चांदीचे विविध प्रकारचे दागिने, नाणी आणि मूर्ती उपलब्ध आहेत.
भरपूर बुकिंग, हत्ती आणि माशांनाही मागणी
एकता ज्वेलर्सचे संचालक राजेश अटलानी यांनी सांगितले की, दर कमी झाल्यामुळे बाजारात दागिन्यांच्या विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तासाठी मोठ्या प्रमाणात बुकिंग झाले आहे. यंदा चांदीचे हत्ती आणि माशांच्या मूर्तींना विशेष मागणी आहे. ग्राहक विविध रेंजमधील चांदीच्या वस्तू खरेदी करीत आहेत. तसेच हिर्यांच्या दागिन्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रमाणपत्रासह उपलब्ध असलेल्या हिर्यांच्या दागिन्यांवर ग्राहकांचा विश्वास आहे. एकता ज्वेलर्समध्ये पाच वर्षांनंतरही हिरा परत केल्यास त्याच्या किमतीच्या 100 टक्के रक्कम दुसरा हिरा खरेदी करताना दिली जाते.
सोने किंवा चांदी, यंदा जबरदस्त प्रतिसाद
त्रमूर्ती ज्वेलर्सचे संचालक अमित सोनी यांनी सांगितले की, सराफा बाजार वर्षभर धनत्रयोदशीची वाट पाहत असतो. यंदा दर कमी असल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदीचे बुकिंग करीत आहेत. त्रिमूर्ती ज्वेलर्समध्ये दिवाळीनिमित्त विविध आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहेत. चांदीची नाणी आणि युटेन्सिल्सला चांगली मागणी असून, किरकोळ विक्रेतेही मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत.





