एल् निनोमुळे दुष्काळ राज्यापुढील सर्वात मोठे आव्हान

मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली चिंता

प्रशासनाच्या तयारीचा मांडला लेखाजोखा

मुंबई /9 ऑक्टोबर :  कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातील सर्वात मोठ्या आव्हानांबद्दल विचारले असता, त्यांनी यंदाच्या वर्षात एल् निनोमुळे उद्भवलेला दुष्काळ हेच सर्वात मोठे संकट असल्याचे सांगितले.
एल् निनोमुळे ओढवलेला दुष्काळ, पिकांचे झालेले नुकसान आणि आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता, ही सध्या राज्यापुढील सर्वात मोठी आणि तातडीची आव्हाने असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
राज्यातील जवळपास 75 टक्के पिकांचे नुकसान झाले असून यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार योग्य त्या उपाययोजना आखत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
एका माध्यमाच्या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातील सर्वात मोठ्या आव्हानांबद्दल विचारले असता, त्यांनी यंदाच्या वर्षात एल् निनोमुळे उद्भवलेला दुष्काळ हेच सर्वात मोठे संकट असल्याचे सांगितले.महाराष्ट्रातील जवळपास 75 टक्के पिकांवर या दुष्काळाचा प्रतिकूलपरिणाम झाला असून, येत्या काही महिन्यांत पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चार्‍याचा तुटवडा भासण्याची दाट शक्यता आहे.
यावर सरकार आतापासूनच नियोजन करत आहे. महाराष्ट्राचा मोठा भाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येत असल्याने राज्यातील 52 टक्के भौगोलिक क्षेत्र दुष्काळप्रवण आहे. येथे अपुरा पाऊस पडतो आणि परतीचा पाऊस हाच पाण्याचा मुख्य स्त्रोत असतो.एका बाजूला राज्याला वारंवार दुष्काळाचा सामना करावा लागत असला, तरी देशातील 40 टक्के मोठे सिंचन प्रकल्प (धरणे) महाराष्ट्रातच आहेत, असा विरोधाभास त्यांनी यावेळी अधोरेखित केला.याआधी, अपुर्‍या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची गंभीर दखल घेत राज्य सरकारने गेल्या 26 सप्टेंबर रोजी राज्यातील 358 पैकी तब्बल 265 म्हणजेच 74 टक्के तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. तसेच पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतसारा (लँड रेवेन्यू) सवलत आणि वीज बिलांमध्ये सवलत यांसारख्या विविध सवलती व मदत उपायांची घोषणा देखील करण्यात आली आहे.

Back to top button