तपोवनेश्वर संस्थानात भक्तीचा जागर

छप्पन भोग महाप्रसादाने भाविकांची मांदियाळी, रामभक्ती, सुंदरकांड पठण अन् महाप्रसादाने परिसर भक्तिमय

अमरावती /25 नोव्हेंबर– श्रद्धा, सेवा आणि सनातन संस्कृतीचा संगम घडविणारा छप्पन भोग महाप्रसाद उत्सव श्री क्षेत्र तपोवनेश्वर संस्थान, बोडणा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी हजारो भाविकांनी भगवान भोलेनाथाचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला.
संपूर्ण संस्थान परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. आमदार राजेश वानखडे आणि आरती वानखडे यांच्या हस्ते पूजन व अभिषेक करण्यात आला. दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे मित्र मंडळाच्या वतीने सादर करण्यात आलेले संगीतमय सुंदरकांड पठण. प्रसिद्ध गायक व संचालक सुमीत साहू यांनी आपल्या ओजस्वी वाणीने रामचरित्र मानस, सुंदरकांडातील प्रसंग आणि भक्तिगीतांची सुरेल मांडणी केली. प्रभू श्रीरामाचे आदर्श, हनुमानाची निष्ठा आणि सुंदरकांडातील प्रेरणादायी प्रसंगांनी उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. भजनांच्या तालावर भाविकांनी भक्तिरसात तल्लीन होऊन वातावरण भारावून टाकले. या सोहळ्याला सुनीलभाऊ राणा, यश खोडके, विलास इंगोले, अभिजीत ढेपे, सुरेखा ठाकरे, प्रकाश काळबाडे, संजय वानखडे, देव अमरावती मंडळाचे संपादक अनिल अग्रवाल, सिटी न्यूजचे संचालक चंदू सोजतिया, गणेश वासणीक, राजू महल्ले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उत्सव यशस्वी करण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष अनिल साहू, उपाध्यक्ष लक्ष्मण पवार, सचिव निलेश कुबडे, प्रवीण सावले, राजेश आचळिया, विठ्ठल पवार, प्रमोद बंड, अमित बैरे, वसंत राठोड, मंगू, प्रा. सुनील साहू, रूपेश साहू, हरी साहू, कामेश साहू, हरिओम साहू, कृष्णा साहू, मिलन बानपुरे, सचिन बानपुरे, रवी पंचमलालजी साहू, सुरेश अर्जुन प्रसाद गुप्ता यांनी पुढाकार घेतला. मंदिर समितीचे भक्तगण व सेवकांनी परिश्रम घेतले. भक्ती, सेवा अन् एकतेचा संदेश-तपोवनेश्वर संस्थानातील छप्पन भोग उत्सवाने धार्मिक परंपरेसोबत सामाजिक एकतेचाही संदेश दिला. भगवान भोलेनाथाचे दर्शन, महाप्रसाद, संगीतमय सुंदरकांड आणि रामभक्तीने भाविकांना आध्यात्मिक समाधान मिळाले. आयोजक, सेवक आणि भक्तांनी एकत्र येत उत्सवाची जबाबदारी पार पाडली. अशा उपक्रमांमुळे सनातन संस्कृती, मंदिर परंपरा, परस्पर सहकार्य आणि समाजातील श्रद्धेची भावना अधिक दृढ होत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.

Back to top button