न्यायदेवतेच्या दारातच अराजकता

पुणे गोळीबारावरून सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल

मुंबई/25 नोव्हेंबर  -पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. न्याय मागण्यासाठी नागरिक ज्या न्यायालयाच्या दारात येतात, त्याच न्यायालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर एका तरुणावर गोळीबार करून कोयत्याने वार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ’न्यायदेवतेच्या दारात अराजकतेचा कहर झाला आहे. महाराष्ट्राला तालिबान करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न पूर्ण झालं आहे का?’ असा सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला.

Back to top button