पोर्तो रिकोची जेनिफर बॅरेटो बनली मिस युनिव्हर्स

नवी दिल्ली/25 नोव्हेंबर : पोर्तो रिकोच्या जेनिफर बारेतो हिची ’मिस युनिव्हर्स 2026’ म्हणून निवड झाली आहे. 25 नोव्हेंबर रोजी राजधानी सॅन जुआन येथे आयोजित 75 व्या अंतिम सोहळ्यात तिला विजेती घोषित करण्यात आले.जेनिफर ही हा किताब जिंकणारी पहिली विवाहित महिला आणि माता ठरली आहे. तिने फेब्रुवारी 2026 मध्ये रॅम्पवर पदार्पण केले होते. जून महिन्यात ’मिस युनिव्हर्स पोर्तो रिको’चा किताब जिंकल्यानंतर तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला. तिने आपले 30 किलो वजनही कमी केले होते. या विजयामुळे पोर्तो रिकोने सहाव्यांदा हा मानाचा मुकुट आपल्या नावावर केला आहे. डॉमिनिकन रिपब्लिकची मेलिसा नुनेझ पहिली उपविजेती (फर्स्ट रनर-अप) ठरली, तर व्हेनेझुएलाची क्लारा वेगास दुसरी उपविजेती (सेकंड रनर-अप) ठरली.





