गुरुनानक जयंतीनिमित्त अमरावतीत भक्तीचा उत्साह
गुरुद्वारात अखंड पाठ, कीर्तन आणि लंगर

* रक्तदान शिबिरातून सामाजिक सेवेचा संदेश
अमरावती /24 नोव्हेंबर- शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू गुरुनानक देवजी यांच्या प्रकाशपर्वानिमित्त अमरावती शहरातील राजापेठ परिसरातील गुरुद्वारा श्री गुरुसिंह सभेत श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पहाटेपासून रात्रीपर्यंत अखंड पाठ, कीर्तन, गुरुबाणी, सामूहिक प्रार्थना आणि गुरूंच्या लंगरचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच शीख समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरुसाहिबांचे आशीर्वाद घेतले. प्रकाशपर्वानिमित्त रक्तदान शिबिराचेही आयोजन करून सामाजिक सेवेचा संदेश देण्यात आला. गुरुनानक जयंतीनिमित्त गुरुद्वाराला आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत सुखमणी साहिबच्या पाठाने धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. त्यानंतर सकाळी 9.15 वाजता अखंड पाठाची सांगता झाली. सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत भाई अरुणदीप सिंहजी यांचा कीर्तन दिवाण झाला. त्यानंतर दुपारी 1.30 वाजेपर्यंत भाई मेहताब सिंहजी यांच्या गुरुबाणी कीर्तनाने भाविक भक्तिरसात रंगले. दुपारी सामूहिक प्रार्थनेनंतर गुरूंच्या लंगरचे आयोजन करण्यात आले. मोठ्या संख्येने भाविकांनी पंगतीत बसून प्रसाद ग्रहण केला.
सायंकाळी आणि रात्रीही कीर्तन दिवाण पार पडले. रात्री 8 ते 9 वाजता भाई अरुणदीप सिंहजी, तर रात्री 9 ते 11 वाजता भाई मेहताब सिंहजी यांनी कीर्तन सादर केले. त्यानंतर सामूहिक प्रार्थना आणि लंगर झाला. या कार्यक्रमाला महापौर श्रीचंद तेजवानी, माजी खा. नवनीत राणा, आ. संजय खोडके, आ. सुलभा खोडके, यश खोडके, उपमहापौर सचिन भेंडे, अधिराज सिंह, काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत, दिनेश अग्रवाल, मनपातील विरोधी पक्षनेते चेतन गावंडे, नगरसेवक मिलिंद बांबल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी आशीष येरेकर आणि पोलीस आयुक्त राकेश ओला यांनीही गुरुद्वारात भेट देऊन गुरुसाहिबांचे आशीर्वाद घेतले. गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चरणजीत कौर नंदा, कार्यकारी अध्यक्ष रविंद्र सिंह सलुजा, सचिव नरेंद्रपाल सिंह अरोरा, राजेंद्र सिंह सलुजा, गुरुविंदर सिंह बेदी, अमरज्योत सिंह जग्गी, दिनेशजी सचदेव, राजेंद्र सिंह छाबडा, प्रल्हाद सिंह सहानी, सोनू बग्गा, राज बग्गा, राजू मोंगा, प्रवीण मोंगा, तज्जू मोंगा, हरविंदर सिंह राजपूत, रबजीत सिंह सेठी, नमन सलुजा, नवनीत सलुजा, अमन सलुजा, जगविंदर सिंह सलुजा, हरभजन सिंह सलुजा, रणपाल सिंह अरोरा, ऋषिकेश वोरा, अंशदीप सिंह बेदी यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. व्यवस्थापन समितीने सर्व उपस्थितांचे स्वागत केले.





