100व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शरणकुमार लिंबाळे यांची निवड

मुंबई /24 नोव्हेंबर – मराठी साहित्यविश्वातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार, समीक्षक आणि दलित साहित्याचे अभ्यासक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची 100 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे, याची अधिकृत घोषणा थोड्याच वेळात होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अनेक ज्येष्ठ साहित्यिकांची नावे चर्चेत होती. त्यामध्ये विजय कुवळेकर, बाबा भांड यांच्यासह काही नावांची चर्चा होती, यात डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. डरहळीूंर डरााशश्ररप र्िीपश ऊी डहरीरपर्ज्ञीारी ङळालरश्रश
100 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्याचे नियोजन आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या शंभराव्या वर्षाचा हा महत्त्वपूर्ण टप्पा असल्यामुळे साहित्यिक, लेखक, कवी, प्रकाशक आणि वाचकांमध्ये या संमेलनाबद्दल विशेष उत्सुकता आहे.
डॉ. शरणकुमार लिंबाळे हे मराठीतील ज्येष्ठ लेखक, कवी, कादंबरीकार, समीक्षक आणि विचारवंत आहेत. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर या गावीत 1 जून 1956 रोजी झाला आहे. एम.ए. आणि पीएच.डी. पर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी साहित्यातील आत्मकथा, कादंबरी, कविता, कथा, समीक्षा आणि वैचारिक लेखन केले आहे. त्यांच्या लेखनातून दलित समाजाचे वास्तव, जातिव्यवस्था, सामाजिक विषमता, संघर्ष, मानवी प्रतिष्ठा आणि परिवर्तनाची भूमिका प्रभावीपणे मांडली गेली आहे.

Back to top button