ग्राहक न्यायालयातील अनेक प्रलंबित; प्रकरणांची फेर-सुनावणी होणार
न्यायालयाकडून बदल्या रद्द

मुंबई /25 नोव्हेंबर : राज्यातील ग्राहक न्यायालयांत अध्यक्ष आणि सदस्यांच्या नेमणुकांबाबत पुन्हा एकदा पेच प्रसंग निर्माण झाला असून त्याचा थेट परिणाम ग्राहक न्यायालयांतील हजारो प्रलंबित सुनावण्यांवर होणार आहे. संबंधित अध्यक्ष वा सदस्य यांनी तक्रारींची सुनावणी पूर्ण करुन त्यावरील निर्णय राखून ठेवलेल्या असंख्य प्रकरणात आता फेरसुनावणी घेणे भाग पडणार आहे. त्यामुळे असंख्य तक्रारदारांच्या अडचणीत भर पडणार असून अशा फेरसुनावणींमुळे ग्राहक आयोगातील प्रलंबित प्रकरणांत आणखी विलंबही होणार आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 22 जून 2026 रोजी दिलेल्या निर्देशानुसार, राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने 18 फेब्र ुवारी 2026 आणि 10 एप्रिल 2026 रोजी 41 जिल्हा आयोगातील अनेक अध्यक्ष आणि सदस्यांच्या केलेल्या सर्व बदल्या रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. या सर्व अध्यक्ष आणि सदस्यांना त्यांच्या मूळ पदस्थापनेच्या जिल्हा ग्राहक आयोगांत त्वरित रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगांचे कामकाज नि:पक्षपाती व पारदर्शक होण्यासाठी शासनाने 22 सप्टेंबर 2025 रोजी निर्णय घेतला होता की, जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष वा सदस्य ज्या जिल्ह्याचे मूळ रहिवासी असतील अथवा ज्या जिल्ह्यातील ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये नेमणूक होण्यापूर्वी त्यांनी वकिलीचा व्यवसाय केलेला असेल तिथेच त्यांची नेमणुक करता येणार नाही. शासनाला काही अध्यक्ष/सदस्यांबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीही या निर्णयाला कारणीभूत असल्याचे शासनाचेच म्हणणे होते. त्यानुसार शासनाने 18 फेब्र ुवारी 2026 आणि 10 एप्रिल 2026 रोजी राज्यातील 41 जिल्हा ग्राहक आयोगांतील अनेक अध्यक्ष आणि सदस्यांची बदली करण्याचे आदेश काढले. शासनाने केलेल्या बदल्यांचे आदेश हे पूर्वलक्षी प्रभावानुसार करता येत नाहीत, या केवळ तांत्रिक मुद्द्यावर नागपूर खंडपीठाचा निर्णय आधारित असून या बदल्यांच्या मूळ उद्देशाला – पारदर्शक आणि नि:पक्षपाती कामकाज न्यायालयाने कुठलीही हरकत वा आक्षेप घेतलेला नाही हे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून मु ंबई ग्राहक पंचायतीने यापूर्वी अशाच एका प्रकरणात ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम 14 मध्ये पूर्वलक्षी प्रभावाने दुरुस्ती घडवून आणली होती हे दाखवून दिले आहे. विशिष्ट अपवादात्मक परिस्थितीमध्ये कायद्यातील वा नियमांतील तरतुदी अथवा शासकीय आदेश पूर्वलक्षी प्रभावानेसुद्धा लागु करता येतात आणि त्याला सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी मान्यता दिलेली आहे, असेही मु ंबई ग्राहक पंचायत ने या पत्रात मंत्रिमहोदयांच्या निदर्शनास आणून दिले आहे.





