महिला महाविद्यालयात आरोग्य विषयक जनजागृती कार्यक्रम
तज्ञांचे विद्यार्थिंनीना मोलाचे मार्गदर्शन

अमरावती /17 फेब्रुवारी : स्थानिक नूतन विदर्भ शिक्षण मंडळ द्वारा संचालित महिला महाविद्यालय, अमरावती येथील गृहअर्थशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक 14 फेब्रुवारी 20026 रोजी आरोग्य विषय जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.जयश्री वैष्णव ह्या होत्या तर प्रमुख वक्त्या म्हणून प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.अनुराधा काकानी व बालरोग तज्ञ डॉ.माधुरी अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले.
डॉ.काकानी यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थिनींना तसेच उपस्थित प्राध्यापकवर्गाला आरोग्यविषयक माहिती दिली सोबतच मासिक पाळी येतांना व पाळी बंद होतांना येणार्या समस्या, आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी स्वच्छतेचे महत्व कशा पद्धतीने आहे व ते कसे राखले गेले पाहिजे हे सांगितले. निमिया कशामुळे होतो व निमिया झाल्यावर कोणती काळजी घ्यावी व औषधोपचार कशा पद्धतीने करावा याविषयी त्यांनी खूप छान माहिती दिली. विद्यार्थिनींच्या काही आरोग्यविषयक प्रश्नांवरही त्यांनी चर्चा केली व त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. अग्रवाल यांनी स्त्रियांना होणार्या कॅन्सरची कारणे सांगितली. बदललेली जीवनशैली, स्वच्छतेचा अभाव, खाण्याच्या बदलत्या सवयी याचा परिणाम कशा पद्धतीने आरोग्यावर होतो याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. कॅन्सर प्रतिबंधक लसीकरणाचेही महत्त्व त्यांनी सांगितले.




