एमआयएमचे गटनेते अ. हमीद व नगरसेवक पार्षद भल्ला यांची तत्परता
अग्निकांडाची माहिती मिळताच सहकार्यांसह डफरीनमध्ये दाखल

अमरावती /24 ऑगस्ट- आज तडके डफरीन रुग्णालयाच्या एनआयसीयूमध्ये अचानक भीषण आग लागली. जवळपास त्याचवेळी नागपुरी गेट पोलीस ठाणे क्षेत्रात मनपाचे गटनेते अ. हमीद व पार्षद भल्ला हे ईद-ए-मिलादुन्नबी पर्वानिमित्त रस्ते तसेच चौक-चौरस्त्यांच्या सजावटीचे काम आपल्या सहकार्यांसोबत करीत होते. त्यावेळी आपल्या संपर्क सूत्रांमार्फत डफरीन रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळताच मनपा गटनेते अ. हमीद व पार्षद भल्ला यांनी सजावटीचे काम सोडून आपल्या सहकार्यांसह थेट डफरीन रुग्णालयाकडे धाव घेतली. रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्यांनी जबरदस्त तत्परता दाखवत मेडिकल स्टाफसोबत मदत व बचावकार्य सुरू केले. त्यामुळे भीषण आग लागलेल्या कक्षात उपचारासाठी दाखल असलेल्या 6 बालकांसह शेजारील दोन विंगमध्ये दाखल असलेल्या 30 बालकांनाही सुरक्षितपणे तेथून बाहेर काढण्यात आले.




