कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक आमसभा उत्साहात

खा.बळवंत वानखडे यांची प्रमुख उपस्थिती

दर्यापूर /27 सप्टेंबर– दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक आमसभा आज कृषी भवन येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या आमसभेच्या उद्घाटनप्रसंगी अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे प्रमुख उपस्थित होते. बाजार समितीचे सभापती, उपसभापती, संचालक, व्यापारी तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमसभेदरम्यान बाजार समितीच्या मागील वर्षातील उत्पन्न, खर्च आणि नफ्याचा सविस्तर आढावा सचिवांनी उपस्थितांसमोर मांडला. तसेच आगामी काळात बाजार समितीच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या विविध विकासकामांचा आराखडाही यावेळी सादर करण्यात आला.
शेतकरी, व्यापारी आणि बाजार समितीच्या हिताच्या विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली. बाजार समितीच्या विकासाला गती देण्यासाठी भविष्यातील नियोजनावरही विचारमंथन करण्यात आले.यावेळी बाजार समितीचे माजी सभापती अरुण पाटील गावंडे आणि बाळासाहेब वानखडे यांचा बाजार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या उत्कृष्ट विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. अतिशय खेळीमेळीच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या आमसभेत बाजार समितीच्या पुढील वाटचालीसाठी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. शेतकरी हित आणि बाजार समितीच्या विकासाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे विधान बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे यांनी शेतकरी बांधवांसोबत केले.

Back to top button