शेतात वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू; सहा महिला गंभीर जखमी

सहा महिला गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

चांदूर रेल्वे तालुक्यातील कळमगाव शिवारातील घटना

चांदूर रेल्वे /26 जून – तालुक्यात पावसाच्या सुरुवातीलाच एक अत्यंत भीषण आणि थरकाप उडवणारी दुर्घटना घडली आहे. कळमगाव येथील पळसखेड पांदण रस्त्यावरील शेत शिवारात शुक्रवारी दुपारी कपाशीची पेरणी आणि शेतीकामात व्यस्त असलेल्या महिलांवर अचानक कडकडाटासह वीज कोसळली. या अंगावर काटा आणणार्‍या नैसर्गिक आपत्तीत सुनंदा नरेश सहारे या 37 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत काम करणार्‍या इतर सात महिला विजेच्या तीव्र धक्क्याने आणि भीतीने गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेने संपूर्ण कळमगाव परिसरावर शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे. ग्रामस्थांनी पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
तालुक्यात दुपारच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि वादळी वार्‍यासह विजांचा प्रचंड कडकडाट सुरू झाला. काही समजण्याच्या आतच शेतात काम करणार्‍या महिलांच्या अंगावर थेट वीज पडली. या दुर्घटनेत सुनंदा सहारे यांचा जागीच जीव गेला. तर सुचिता उगले, राजकन्या पारिसे, प्रिया डोंगरे, लक्ष्मी रंगारी, पुष्पा केवट आणि उज्वला भालेकर या महिला गंभीरेतात वीज कोसळून एका महिलेचा …
जखमी झाल्या. सुचिता उगले यांची प्रकृती चिंताजनक असून विजेच्या तीव्र धक्क्यामुळे त्यांचा एक हात निकामी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याशिवाय सुमन निकोरे आणि भारती निकोरे या महिलांना कोणतीही शारीरिक दुखापत झाली नसली तरी या भीषण प्रसंगामुळे त्या प्रचंड घाबरल्या आहेत. सर्व जखमींना तातडीने चांदूर रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या घटनेची माहिती मिळताच चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय आखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण यांनी घटनास्थळ गाठून रीतसर पंचनामा केला. मृत महिलेचे शवविच्छेदन शनिवारी करण्यात येणार आहे. घटनास्थळी तहसील मंडळाचे अधिकारी निलेश स्थूल यांनी भेट देऊन पाहणी केली. अचानक कोसळलेल्या या संकटामुळे सहारे कुटुंबाचा मुख्य आधार हिरावला गेला असून संपूर्ण गाव सुन्न झाले आहे. शासनाने मृत महिलेच्या कुटुंबाला नैसर्गिक आपत्ती अंतर्गत तात्काळ आर्थिक मदत द्यावी आणि जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलून योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी आर्त मागणी आता कळमगावच्या ग्रामस्थांकडून केली जात आहे.
पेरणीची घाई नको, वीज चमकताना सुरक्षित आसरा घ्या-निसर्गाची अशीही किमया की मान्सून सक्रिय , मान्सून दाखल झाला पाहिजे त्या प्रमाणात पाणी पडले नाही. यावेळी मात्र पाणी आले नाही वादळ सुद्धा गरजले नाही पण वीज कडाडल्या आणि वीज पडली. त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. शेतकरी बांधवांनी पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी. घाई करू नका. पाऊस किंवा वीजा चमकत असतील तर कुठेतरी आसरा घेऊन त्या ठिकाणी थांबावे. असे आवाहन प्रशासनाने केली आहे. – पूजा माटोडे, तहसीलदार चांदूर रेल्वे

संबंधित बातम्या

Back to top button