एफडीएची डॉमिनोज पिझ्झावर मोठी कारवाई

मुंबई /12 ऑगस्ट -आज तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील एफडीएने राज्यातील डॉमिनोझ पिझ्झाच्या आऊटलेट्सनां मोठा दणका दिला आहे. तसेच अस्वच्छता आणि इतर कारणांमुळे राज्यातील डॉमिनोझ पिझ्झाच्या चार आऊटलेट्सचा परवाना रद्द केला आहे. परवाना रद्द करण्यात आलेल्या आऊटलेट्समध्ये मुंबईतील 3 आऊटलेट्सचा समावेश आहे. एफडीएने राज्यातील डॉमिनोझ पिझ्झाच्या विविध आउटलेट्समध्ये केलेल्या पाहणीदरम्यान, काही ठिकाणी अस्वच्छता आणि अन्य त्रुटी आढळून आल्या होत्या. आता अशा चार आऊटलेट्सवर मोठी कारवाई करत त्यांचा परवाना रद्द केला आहे. परवाना रद्द करण्यात आलेल्या डॉमिनोझ पिझ्झाच्या आऊटलेट्समधील तीन आऊटलेट्स हे मुंबईत आहेत. तर एक आऊटलेट्स सातारा जिल्ह्यातील आहे. कारवाई करण्यात आलेले डॉमिनोझ पिझ्झाचे आऊटलेट्स हे जुबिलंट फुडवर्क्स लिमिटेडकडून चालवण्यात येत होते.




