निवडणूक आयोगाने आधीच शेवट ठरवला होता
कपिल सिब्बल यांचा खळबळजनका दावा

एकनाथ शिंदेंना धक्का
नवी दिल्ली/12 ऑगस्ट ; शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावरून ठाकरे आणि शिंदे गटामध्ये सुरू असलेल्या कायदेशीर लढाईची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी सध्या महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे.
ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आणि शिवसेनेतील संघटनात्मक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. याचदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या एका महत्त्वपूर्ण टिप्पणीची चर्चा सुरू झाली आहे. कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या पक्षघटनेचा संदर्भ देत 1999 च्या घटनेमध्ये पक्षप्रमुखपदाबाबतची तरतूद आणि त्यानंतर झालेल्या संघटनात्मक बदलांवर प्रश्न उपस्थितकेला. निवडणूक आयोगाने आपल्या सोयीने निर्णय घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.सिब्बल यांनी युक्तिवाद करताना शिवसेनेत फूट पडल्याचे सुरुवातीला स्पष्ट नसताना त्याबाबतच्या तक्रारी आणि त्यानंतरची प्रक्रिया कशी करण्यात आली, असा सवाल उपस्थित केला. तसेच पक्षातील संघटनात्मक बाबींचा विचार न करता निर्णय घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. याचदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने, तुम्ही ज्या संघटनात्मक गोष्टी मांडत आहात, त्या बरोबर वाटत आहेत, अशी टिप्पणी केल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच कठीण परिस्थितीतही निर्णय लोकशाही पद्धतीने घेतले गेले पाहिजेत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवल्याचे वृत्त आहे.




