परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून होईल

काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांचा विश्वास

पंतप्रधान मोदीसह आरएसएसवर जोरदार निशाणा

मुंबई /1 सप्टेंबर  : देशाची लोकशाही आणि संविधान संपवण्याची प्रक्रिया सुरू आहे. भाजपने निवडणूक आयोगाला स्वतःचे एजंट बनवले असून देशात चोरांचे राज्य आहे. मतचोरी, आमदार- खासदारांची चोरी, देशाची संपत्ती चोरी, तरुणांच्या नोकर्‍यांची चोरी, विद्यार्थ्यांच्या परीक्षा चोरी केल्या जात आहेत. आता हे बदलण्याची वेळ आली असून लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी देशात परिवर्तनाची गरज असून त्याची सुरुवात महाराष्ट्रातून होईल, असा विश्वास काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी (01 ऑक्टोबर) व्यक्त केला.
डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी आज काँग्रेसचे प्रदेश मुख्यालय असलेल्या टिळक भवन येथे प्रभारी पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजपवर हल्ला चढवला. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधीमंडळ पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गट नेते सतेज पाटील, पक्षाचे सरचिटणीस मुकुलान मोदी त्यावर काहीच बोलत नाहीत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहेत. दलित, अल्पसंख्याक, महिला यांच्यावर अत्याचार वाढले आहेत. महाराष्ट्रातही वेगळी परिस्थिती नाही. महाराष्ट्रातून उद्योग बाहेरच्या राज्यात जात आहेत. त्यामुळे नोकर्‍या संपत चालल्या असून बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. महाराष्ट्रात 65 टक्के लोक भाजप-आरएसएस विरोधी विचाराचे असल्याचे डॉ. प्रसाद यांनी सांगितले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, तरुण वर्गासाठी काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी संघटन मजबुतीवर भर दिला. यावर्षी संघटना विस्तारावर काम करायचे असून बुथस्तरावर , ग्राम पातळीवर, मंडळ स्तरावर काँग्रेसचा विस्तार झाला पाहिजे. हे संघटना विस्ताराचे काम 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाईल. आपल्याला भाजप आणि मित्रपक्षांना हरवायचे आहे. सध्या राज्यात भाजप सरकारविरोधी वातावरण असल्याने भाजप पराभवाचे लक्ष्य ठेवून काम करा, असे सपकाळ म्हणाले.

Back to top button