वलगाव व नागपुरी गेट जुगार अड्डयावर छापा

गुन्हे शाखेची धडक कारवाई

अमरावती /26 जून- जिल्ह्यातील वलगाव व नागपूरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत जुगार अड्डा उद्ध्वस्त केला आणि देशी दारू विक्री करणार्‍यास जेरबंद केले. या कारवाईत चार जुगारींना पकडून त्यांच्याकडून 10 हजार 350 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली, तर देशी दारू प्रकरणी 3 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुन्हे शाखा एकच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वलगाव हद्दीतील साहुरा गावात जुगार सुरू असल्याचे समजले. त्या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी चार जुगारींना रंगेहाथ पकडले. पकडलेल्या आरोपींमध्ये रिधपूर गावातील बन रामचंद्र वानखडे (55), साहुरा गावातील लियाकत खान शकर खान पठाण (67), अंबाडा येथील शकील शहा सरदार शहा (47) आणि चांदूर बाजार येथील फिरोज खान सराफत खान (44) यांचा समावेश आहे. दरम्यान, याच ठिकाणी जुगार खेळणारा श्रीकृष्ण माहोरे (45) हा पळून जाण्यात यशस्वी झाला. याच वेळी नागपूर गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मसानगंज परिसरात अवैध देशी दारू विक्री करणार्‍यावर कारवाई करण्यात आली. मसानगंज येथील मनपा शाळा क्रमांक दोनच्या जवळ राहणारा रोहित रमेश साहू (33) याच्याकडून पोलिसांनी तीन हजार तीनशे रुपयांची देशी दारू जप्त केली. गुन्हे शाखा एकचे निरीक्षक दिनेश दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मनीष वाकोडे, दशरथ आडे, फिरोज खान, मंगेश लोखंडे, नजीमोद्दीन सय्यद, सचिन भोयर, रणजित गावंडे, सूरज चव्हाण, निखिल गोडाम, सागर ठाकरे, नरेश मोहरील आणि चेतन शर्मा या पथकाने ही कारवाई केली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button