मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी 2.0 पोर्टलवर अर्ज करावे
मत्स्यव्यवसाय विभागाचे आवाहन

अमरावती/15 नोव्हेंबर : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत (सीएमएमएसवाय) पात्र लाभार्थ्यांसाठी महाडीबीटी 2.0 पोर्टलवर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विभागाच्या अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी महाडीबीटी 2.0 पोर्टलवर संबंधित जिल्ह्याच्या मत्स्यव्यवसाय कार्यालयाशी संपर्क करून अर्ज सादर करण्याचे आवाहन, अमरावती प्रादेशिक मत्स्यव्यवसाय, कार्यालयाचे उपायुक्त सुनिल जांभुळे यांनी केले आहे.
मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा विकास साधणे, मत्स्यव्यवसायाशी संबंधित लाभार्थ्यांना प्रोत्साहन देणे तसेच मत्स्यव्यवसायाच्या विविध घटकांना योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडून ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा’ योजना राबविण्यात येत आहे. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणार्या पात्र मत्स्य व्यवसायिकांनी, मत्स्य पालकांनी, मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी तसेच योजनेच्या विविध घटकांसाठी पात्र असलेल्या इतर लाभार्थ्यांना महाडीबीटी 2.0 पोर्टलवर उपलब्ध असलेल्या योजनांची व घटकांची माहिती तपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. महाडीबीटी 2.0 पोर्टलच्या हीींिीं:// ारहर वलीं2. ारहरीरीहीींर.र्सेीं.ळप/ या अधिकृत संकेतस्थळावर नवीन नोंदणी करून महाआयडी तयार करावी व तद्नंतर उपलब्ध खात्याद्वारे लॉगिन करावे. या योजनेची माहिती व पात्र घटक तपासून संबंधित घटकाची निवड करत अर्जामध्ये माहिती भरावी. आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा. नंतर अर्ज क्रमांक व पोचपावती जतन करून ठेवावी आणि वेळोवेळी अर्जाची स्थिती तपासावी. सीएमएमएसवाय योजनेंतर्गत अर्ज करण्यापूर्वी प्रथम हीींिीं://पषवि.वेष.र्सेीं.ळप/पषवि// या पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणीनंतर आवश्यक माहितीची खात्री करावी. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा. अर्ज भरतांना अडचण उद्भवल्यास अर्जदारांनी संबंधित जिल्हा सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, श्री. पुंडकर यांची इमारत, पहिला माळा, अतुल मंगल कार्यालयाजवळ, रुक्मिणी नगर, अमरावती- 444606. संपर्क क्रमांक 0721-2662421 मो. 9022020725, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, जुने पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाजूला, जुनी ग्रामीण भूविकास बँक यांची इमारत, दुसरा माळा, अकोला-444001. संपर्क क्रमांक 0724-2423155, मो. 77410 19328, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, प्रशासकीय इमारत, पहिला माळा, बस स्टँड समोर, धाड रोड, बुलढाणा-443001. संपर्क क्रमांक 07262-242254 मो. 8668267088, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, कोलटकर वाडी, ग्रीन पार्क कॉलनी, श्री. विसपुते यांची इमारत, एलआयसी ऑफिसच्या पाठीमागे, वाशिम-444505. संपर्क 07252-299303 मो. 8459581133, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, प्रशासकीय इमारत, पहिला माळा, मा. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, यवतमाळ-445001. संपर्क 07232-244388 येथे संपर्क साधता येणार आहे.





