मनपात राजर्षि शाहू महाराज जयंती साजरी

अमरावती /26 जून: राजर्षि शाहु महाराज यांची जयंती निमित्य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेमध्ये संपन्न झाला.
राजर्षि शाहु महाराज यांची जयंती निमित्य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे हस्ते राजर्षि शाहु महाराज यांच्या प्रतिमेस हारार्पण विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे सकाळी 11.00 वाजता करण्यात आले. यावेळी महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, गटनेता डॉ.राजेंद्र तायडे, झोन सभापती सौ.स्वाती कुलकर्णी, नगरसेवक रतन डेंडुले, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, प्रमोद मोहोड, भुषण खडेकार, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button